घरमुंबईसमृद्धी महामार्गाच्या कर्जासाठी शासन हमी देण्यास तयार; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

समृद्धी महामार्गाच्या कर्जासाठी शासन हमी देण्यास तयार; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Subscribe

समृद्धी महामार्गाच्या कर्जासाठी शासन हमी देण्यास तयार असल्याचा निर्णय आज मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटींचे अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये एखाद्या दुर्घटनेतील बाधित जवानांचा देखील विचार केला आहे. युद्ध किंवा इतर कुठल्या मोहिमेत जवानांना अपंगत्व आल्यास त्यांना सरकारकडून एकरकमी अनुदान देण्यात येते. या एकरकमी अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

  • युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरक्षेसंबंधी मोहिमेत, चकमकीत किंवा देशाबाहेरील मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या आणि अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणाऱ्या एकरकमी अनुदानात भरीव वाढ.
  • समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून देण्यास मान्यता.
  • राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयास राज्य सरकारने दिलेल्या फोर्ट महसूल विभागातील मिळकतीच्या भाडेपट्ट्याचे नाममात्र दराने नूतनीकरण करण्यास मंजुरी.
  • शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यांना 7600 पेक्षा जास्त ग्रेडवेतन असलेल्या पदांच्या निर्मितीस मान्यता.
  • औरंगाबादच्या राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्यात येणार.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग असे करण्याचा निर्णय.
  • महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटींचे अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी देण्यास मान्यता.
  • विधि व न्याय विभाग, मंत्रालय (खुद्द) यांच्या आस्थापनेवर विधि सल्लागार-नि-सहसचिव तसेच प्रारुपकार-नि-सहसचिव या संवर्गात प्रत्येकी एक अशी एकूण दोन पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -