घरमुंबईVideo : माझगावच्या दहीहंडीत गोविंदाची सुरक्षा वाऱ्यावर!

Video : माझगावच्या दहीहंडीत गोविंदाची सुरक्षा वाऱ्यावर!

Subscribe

शिवसेना शाखा क्रमांक २०९ मधील हंडी उत्सवाच्या दरम्यानच्या या व्हिडिओमुळे, गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

सध्या मुबंईसह ठाणे, नवी मुंबई शहरांमध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात गोविंदा पथकांसह सेलिब्रिटीज आणि काही राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. दहीहंडीचा उत्सव म्हटला की गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न हा आलाच. जवळपास सर्वच मंडळं पथकातील गोविंदांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत असतात. मात्र, माझगावच्या शिवसेना शाखा क्रमांक २०९ आयोजित दहीहंडी उत्सवाता सुरक्षेची आवश्यक काळजी घेतली नसल्याचं चित्र दिसत आहे. संबंधित पथकातील गोविंदाच्या डोक्यावरील हेल्मेट्सचा तसंच चेस्ट गार्डचा किंवा सेफ्टी मॅटचा अभाव याठिकाणी पाहायला मिळत आहे. पाहा याचसंदर्भातील हा व्हिडिओ :

शिवसेना शाखा क्रमांक २०९ येथील हंडीउत्सवात सुरक्षिततेचा बोजवारा?

- Advertisement -

दहीहंडी उत्सवाचे बाजरीकरण?

गेले काही वर्ष कायद्याच्या कचाट्यात अडकलेला दहीहंडी उत्सव यंदा त्यातून बाहेर पडला आहे. मागील वर्षापर्यंत दहीहंडीला उंचीची मर्यादा होती. अनेक राजकीय नेते आणि दहीहंडी समन्वय समितीच्या हस्तक्षेपानंतर उंचीची मर्यादा जरी यातून काढली असली, तरी वयाची मर्यादा यामध्ये कायम ठेवण्यात आली आहे. यासाठी यंदा तरी मुंबईकरांना थरांचा थरार पाहायला मिळणार आहे. मात्र, आता या दहीहंडी उत्सवाचे बाजरीकरण झाले आहे का? याविषयी ‘माय महानगर’ने एका महाचर्चेचे आयोजन केले होते. पाहा, तज्ज्ञ याविषयी काय म्हणतात ते…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -