Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई धार्मिक प्रचारासाठी ECI ने काही बदल केले आहेत का? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

धार्मिक प्रचारासाठी ECI ने काही बदल केले आहेत का? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Subscribe

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकी अवघे काही दिवस बाकी असताना राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत नागरिकांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटकातील मतदारांनी मतदान करताना ‘बजरंग बली की जय’ असे म्हणत मतदान करावे, असे वक्तव्य केले होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टोला लगावला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासह बडे नेते प्रचार उतरले आहेत, तर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीसह (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाशासीत राज्यांचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मतदारांनी मतदान करताना ‘बजरंग बली की जय’ असे म्हणत मतदान करावे, वक्तव्य केले होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

- Advertisement -

ECI ने धार्मिक प्रचाराच्याबाबतीत काही बदल केले आहेत का? 
उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांच्यावर मतदानाची बंदी घालण्यात आली होती. मग आता निवडणुक आयोगाने (ECI) धार्मिक प्रचाराच्याबाबतीत काही बदल केले आहेत का? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जनतेला आवाहन केले की, पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यावरून ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा देत मतदान करण्यात येणार असेल तर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान देताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी लोकांनी सुद्धा ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा द्यावी. ते म्हणाले की, कोणतेही सरकार आले तरी तेथील मराठी लोकांवर भाषिक अत्याचार होत आहे, त्यामुळे एकजूट तुटू न देता एकीची वज्रमूठ एकीकरण समितीने तिथे दाखवून द्यावी असेही ठाकरे म्हणाले.

…म्हणून मोदींकडून आवाहन
काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन कर्नाटकमधील जनतेला दिले आहे. या मागणी विरोधात भाजप आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (3 मे) कर्नाटकातल्या अंकोला येथे झालेल्या जाहीर सभेत मतदान यंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करा, असे आवाहन केले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -