घरमुंबईVideo : डोंबिवलीत फेरवाल्यांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी

Video : डोंबिवलीत फेरवाल्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

Subscribe

डोंबिवलीमध्ये सोमवारी रात्री अनाधिकृत फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अधिक कठीण होत आहे. डोंबिवली स्टेशन परिसरात सोमवारी रात्री फेरीवाल्यांच्या दोन गटांमध्ये बसण्याच्या जागेवरून तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत एका महिलाही जबर जखमी झाली आहे. या मारहाणीमुळे काहीकाळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.

बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी | Hawkers Group Fight in dombivali video viral

बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी | Hawkers Group Fight in dombivali video viral

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 28, 2019

- Advertisement -

ही हाणामारी कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यामुळे तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर रामनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ४ दिवसांमधली डोंबिवलीत हाणामारी होण्याची ही दुसरी घटना असल्याचं बोललं जातंय.

डोंबिवलीमध्ये स्टेशन परिसरात, ब्रीजवर अनेक अनधिकृत फेरिवाले विक्रीसाठी बसलेले असतात. अनेकदा याविषयी तक्रार करूनही महापालिका दखल घेत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -