मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह (Mumbai) आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. मुंबईतील परिसरात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबईसह (Mumbai) आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. मुंबईतील परिसरात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पाणी साचल्याने आणि रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. (heavy rain affect on road transport in mumbai)

रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईत शुक्रवार सकाळपासूनच वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने रस्ते वाहतुकीसह (Road Transport) रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे. तसेच, रेल्वेच्या पश्चिम आणि मध्ये रेल्वे मार्गावरील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

पावसाचा जोर वाढला

अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या परिसरात पावसाचा जोर वाढला असून काही ठिकाणी सखल भागात पाणी (Water Logging) साचायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गुरूवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे अनेकठिकाणी पाणी साचलं होतं. मात्र, मध्यरात्री पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरले. परंतु, आज पहाटेपासूनच पावसाने पुन्हा बॅटिंग सुरू केल्याने मुंबईच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

१७६ मिमी पावसाची नोंद

मुंबईत गुरुवारी सकाळी ८ ते रात्री ८.३० पर्यंत बारा तासात कुलाबा १७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, सांताक्रुजमध्ये १३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत मान्सून सक्रिय, सखल भागात पाणी साचायला सुरुवात