घरमुंबईभिवंडीत दूध चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

भिवंडीत दूध चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

मागील काही दिवसांपासून भिवंडीत सुरू असलेल्या दुधाच्या चोरीचा सुगावा अखेर नारपोली पोलिसांना लागला.

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी हजारो लिटर दूधाची चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टोळीचा म्होरक्या दूध विक्रेता एजंट असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटेच्या सुमारास दूध विक्रेत्यांच्या मदतीने नारपोली पोलिसांनी दूध चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. बद्रुजम्मा अब्दुल वसीम अन्सारी, आयाज गुड्डू खान या दोघांसह दूध विक्रेता अब्दुल चौधरी अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेल समोर असलेल्या दूध विक्रेते अख्तर हुसैन यांच्या ‘शब्बीर डेअरी’ वरून मागील तीन महिन्यात पाच ते सात वेळा दूध चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे सावधगिरीचा पर्याय म्हणून हुसैन यांनी दूध डेअरी परिसरात सीसीटीव्ही लावले. या सीसीटीव्हीद्वारे दूध चोरीची घटना कळताच याबाबतची माहिती हुसैन यांनी नारपोली पोलिसांना दिली.

- Advertisement -

दरम्यान या दूध चोरी प्रकरणी महेश कोकुलवार यांनी त्यांच्याकडील ५२८० रुपये किंमतीच्या १२० लिटर दूधाच्या चोरीची फिर्याद निजामपूर पोलीस ठाण्यात दिली. निजामपूर पोलिसांनी अब्दुल चौधरी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या आरोपींनी आणखी कोणकोणत्या ठिकाणी दूधचोरी केली त्याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

नारपोली पोलिसांनी त्यांना निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले

येथील दूध विक्रेत्यांच्या मदतीने नारपोली पोलिसांनी रात्रीची गस्त घातली. त्यानुसार आज पहाटे एका रिक्षातून दहा कॅरेट्समधून १२० लिटर दूध घेऊन जाताना दोघांना नारपोली पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्या दोघांकडे चौकशी केली. चौकशीत, निजामपूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजी चौक येथील महेश कोकुलवार यांच्याकडे गाडीने उतरविण्यात आलेले दूध पुढे अंजूरफाटा खारबाव रोडवरील अब्दुल चौधरी यांच्या डेअरीवर घेऊन जात असल्याचे त्या दोघांनी नारपोली पोलिसांना सांगितले. बद्रुजम्मा अब्दुल वसीम अन्सारी, आयाज गुड्डू खान या दोघा चोरट्यांसह अब्दुल चौधरी या दूध विक्रेत्या दलालाला नारपोली पोलिसांनी ताब्यात घेत निजामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

- Advertisement -

दूध विक्रेत्यांनी तक्रार दाखल केली नाही

या प्रकरणी दापोडा येथील दूध विक्रेते यशवंत पाटील हे मागील दोन महिने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींनी विविध ठिकाणाहून दररोज सुमारे दहा कॅरेट मधील ५२८० रुपये किंमतीच्या १२० लिटर दुधाची चोरी केल्याची माहिती दिली. अशाप्रकारे सुमारे हजारो लिटर दुधाची चोरी या टोळीने केली. मात्र येथील दूध विक्रेते तक्रार दाखल करीत नसल्याने या चोरट्यांचे फावले, अशी माहिती दूध विक्रेते यशवंत पाटील यांनी दिली.

कमी किंमतीत करायचा चोरलेल्या दुधाची विक्री

या टोळीचा म्होरक्या अब्दुल चौधरी हा दूध विक्रेता असून त्याने ही टोळी बनवली. त्यानंतर चोरी केलेल्या दूधाची अब्दुल चौधरी हा त्याच्या डेअरीतून कमी किंमतीत विक्री करत असे. तसेच या टोळीतील साथीदार हे पूर्वी अमूल दूध मुख्य डीलर्सच्या गाडीवर दुधाचे कॅरट उतरविण्याचे काम करत असत. मात्र मागील तीन महिन्यांपासून काम सोडून देत त्यांनी अब्दुल चौधरीसोबत संगनमत करून दूध चोरी करण्यास सुरवात केल्याची माहिती मिळाली आहे.

सुरूवातीला पोलिसांनीही केले दुर्लक्ष

भिवंडी शहर व नजीकच्या तालुक्यातील ग्रामीण भागात अमूल दुधाचा खप अधिक आहे. त्यामुळे सुमारे ७५ हजार लिटर दुधाची दररोज विक्री होते. अमूल दूध कंपनीच्या मुख्य डीलर्स कडून मध्यरात्रीनंतर शहरातील व तालुक्यातील विविध दूध विक्री दलालांनी नेमून दिलेल्या ठिकाणी नियमित दुधाचे कॅरेट उतरवले जातात. परंतु, मागील दोन ते तीन महिन्यापासून शेकडो लिटर दूधाचा कमी पुरवठा होत असल्याने दूध विक्रेत्यांकडून दूध पोहचवणाऱ्या गाडीचालका वर संशय घेत मुख्य डीलर्सकडे त्याची तक्रार करण्यात आली. यावेळी दूध पुरवठा कमी केला जात नसून वाहन चालकही दुधाची चोरी करत नसल्याचे समोर आले. सुरवातीला पोलिसांनीसुद्धा या बाबत कोणतीही फिर्याद दाखल करून न घेता केवळ साधी तक्रार लिहून घेत. त्यामुळे या दूध चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -