मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप नाही; ‘त्या’ वादग्रस्त विधानावर मुकेश खन्ना ठाम

मुकेश खन्ना यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर मी एफआयआरला घाबरत नाही. मला माझ्या बोलण्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही, असे ते म्हणाले आहेत.

MUMKESH KHANNA

शक्तिमान मालिकेमुळे मुकेश खन्ना घराघरात पोहोचला आहे. मात्र, महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता मुकेश खन्ना चर्चेत आला आहे. दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिसांकडे मुकेश खन्ना विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यानंतर मी एफआयआरला घाबरत नाही, असे वक्तव्य मुकेश खन्नाने केले आहे.

दिल्ली पोलिसांना मुकेश खन्ना विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला आयोगाने केली आहे. मुकेश खन्ना विरोधात सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मी एफआयआरला घाबरत नाही. मला माझ्या बोलण्याचा कसलाही पश्चाताप झालेला नाही, असे ते म्हणाले.

व्हिडिओ झाला होता व्हायरल –

अभिनेता मुकेश खन्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये मुकेश म्हणत आहे,”जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारते ती तिचा व्यवसाय करत. कारण कोणत्याही सुसंकृत समाजातील मुलगी असे बोलत नाही. त्यांनी हा व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे नेटकरी मुकेश खन्नाला ट्रोल करत आहेत.