घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना विरोधात लढा देण्यासाठी आयआयटी मुंबईने तयार केली उपकरणे!

CoronaVirus: कोरोना विरोधात लढा देण्यासाठी आयआयटी मुंबईने तयार केली उपकरणे!

Subscribe

स्टार्ट अपच्या माध्यमातून हॉटस्पॉट मॉनिटरिंग, स्मार्ट ट्रॉली, रॅपिड ऍम्ब्युलन्स, प्रेगन्सी केअर आदी सुविधा बनवल्या.

कोरोनाविरोधातील लढ्यात प्रत्यक्ष आघाडीवर असलेले डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आणि रुग्णांवर उपचार करणे सोयीचे व्हावे यासाठी आयआयटी मुंबईने काही तांत्रिक उपकरणे तयार केली आहेत. आयआयटी मुंबईने २५ स्टार्टअप कंपन्यांनासोबत घेऊन ही उपकरणे बनवली आहेत. सरकारकडून लॉकडाउन जाहीर केल्यानंतर स्टार्टअप कंपन्यांकडून ही तांत्रिक उपकरणे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये हॉटस्पॉट मॉनिटरिंग, स्मार्ट ट्रॉली, शीघ्रगती रुग्णवाहिका सेवा, गर्भवतींसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.

आयआयटी मुंबईमध्ये असलेल्या स्टार्टअप कंपनीपैकी ऑगले एआय आणि फाल्कन लॅब यांनी शहरातील गर्दीची ठिकाणे शोधण्यासाठी, त्याचा मागोवा घेण्यासाठी पर्याय शोधला आहे. शरीराचे तापमान दाखवणारी पद्धत ऑगले स्टार्टअपकडून विकसित करण्यात आली. सरकारी इमारती, सार्वजनिक ठिकाणे, मॉल तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी होणारी ठिकाणे आणि कार्यालय येथे वापरण्यात येणारी चेहरा ओळखणारी पद्धत अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केल्याचे टेक टीमचा प्रमुख तेजेंदु यांनी सांगितले. पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा वाढवता यावी यासाठी क्वारंटाईन परिसरात ड्रोनमधून नागरिकांचे सर्वेक्षण केले. तर फाल्कनने महापालिकेशी संबंधित कामांसंदर्भात संशोधन केले. त्यांनी ज्या रुग्णांमध्ये तापाची लक्षणे होती त्यांच्या थर्मल चाचणीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी स्मार्ट ट्रॉली जनयू टेक्नॉलॉजी मार्फत बनवण्यात आली. ही ट्रॉली रिमोटवर चालणारी असून यामधील कॅमेऱ्यामुळे रुग्णांशी संवाद साधने शक्य होत आहे. तसेच ही रिमोटवर चालणारी असल्यामुळे आयसोलेशन वार्डमध्ये रुग्णांना अन्न, औषधे, कपडे आणि अन्य साहित्याचा पुरवठा करणे सहज शक्य होणार आहे. अशा प्रकारची ट्रॉली हैदराबाद, लखनऊ, दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येत असल्याचे कंपनीचे संस्थापक साई हेमंत यांनी सांगितले.

- Advertisement -

पोलिसांना १२५० फेस प्रोटेक्शन शिल्डचे वाटप

रूटटूमार्केट या कंपनीने हेल्थ केअर वस्तू बनवल्या असून त्यामध्ये दररोज पाच हजार पीपीई बनवत आहेत. त्याचप्रमाणे अडॅप्ट या स्टार्टअपने फेस प्रोटेक्शन शिल्ड बनवण्यावर भर दिला आहे. यातील ठाणे वाहतूक पोलिसांना २०० तर रत्नागिरी पोलिसांना १२५० फेस प्रोटेक्शन शिल्डचे वाटप केले आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना या काळामध्ये तपासणी, प्रसूतीदरम्यान तसेच नवजात बालकाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केअरएनएक्स या टीमने ‘डोन्ट पॅनिक, प्रोटेक्ट’ ही व्हिडिओ सिरीज तयार केली आहे. याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी १० हजारपेक्षा अधिक महिलांचे समुपदेशन केले आहे. हेल्पनाऊ स्टार्टअप टीमकडून मेडकॅब नावाची अँब्युलन्स सुरु केली आहे. हि अँब्युलन्स १५ मिनिटात उपलब्ध होते. त्यांनी उबेरच्या ड्रायव्हरसोबत करार केला असून त्यांना एएचए प्रमाणपत्र व आवश्यक उपकरणे दिली आहेत. सध्या मुंबईमध्ये ३५० वाहने रस्त्यावर आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाला हरवण्यासाठी एक कोटींहून अधिक योद्धे सज्ज!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -