घरCORONA UPDATEडोंबिवलीत दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त, लाखो रुपयांचे रसायन जप्त

डोंबिवलीत दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त, लाखो रुपयांचे रसायन जप्त

Subscribe

डोंबिवलीतील घाइसर गाव येथील खदाणीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात दोन दारूच्या हातभट्या उध्वस्त कऱण्यात आलेल्या असून सुमारे अडीज लाख रुपये किमतीचे रसायन जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आलेला असून बेकायदेशीररित्या हातभट्या चालवणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाने हि कारवाई केली लॉकडाउनच्या काळात या विभागाकडून गावठी दारू विक्री आणि हातभट्टी चालवणाऱ्या २५ गुन्हे दाखल कऱण्यात आलेले असून लाखो रुपयाचा ऐवज जप्त कऱण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अनिल पवार यांनी दिली.

डोंबिवलीतील घईसार गाव या ठिकाणी असलेल्या खदाणीत हातभट्ट्या लावून मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाचे निरीक्षक अनिल पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.डी. खरात आणि पथक यांनी शुक्रवारी दुपारी घईसार गाव येथील खदानीत छापा टाकून येथील गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उधवस्त केल्या. घटनास्थळी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन मोठ्या प्रमाणात मिळून आले असून हे रसायन आणि ड्रम असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. मात्र छापा टाकण्यापूर्वीच हातभट्टी चालवणाऱ्यांनी पोबारा केला होता, त्यामुळे घटनास्थळी कोणीही मिळून आलेले नसल्याची माहिती निरीक्षक पवार यांनी दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरु आहे.

- Advertisement -

राज्यात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत २५ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून लाखो रुपयाचे रसायन आणि गावठी बनवण्यासाठी लागणारी सामुग्री जप्त कऱण्यात आलेली असल्याची माहिती निरीक्षक अनिल पवार यांनी आपलं महानगरला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -