घरमुंबईपाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल!

पाच लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल!

Subscribe

छळाला कंटाळून विवाहितेने पतीसह सासरच्या ६ जणां विरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लग्नानंतर ५ दिवसांनंतर पासूनच पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेने माहेरातून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहितेला मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ केल्याने या छळाला कंटाळून विवाहितेने पतीसह सासरच्या ६ जणां विरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती राजेश भालेराव, सासू इंदुबाई भालेराव, सासरा सुदाम भालेराव, दिर पांडुरंग भालेराव, पोपट भालेराव, नणंद सीमा कांबळे (सर्व रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत.

नणंदेने वहिनीला दूरध्वनीवर पैशांची मागणी केली

भिवंडी तालुक्यातील कोनगांव येथील करुणा वाघमारे (२१) हिचा विवाह १९ मे २०१९ रोजी पुणे जिल्ह्यातील मौजे कामशेत येथील राजेश याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर करुणा पाच परतवणीच्या कार्यक्रमासाठी माहेरी आली होती. त्यावेळी नणंद सीमा हिने मोबाईलवरून करुणा हिच्याशी संपर्क साधला. यावेळी ती आपल्या वहिनीला म्हणाली की, “तुझ्या पतीला ऍम्ब्युलन्स घ्यायची आहे. त्यामुळे तू सासरी येताना तुझ्या वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये.” त्यावर करुणा म्हणाली की, “माझ्या वडिलांच्या आजारपणावर खूप पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे मी पैसे आणू शकत नाही,” असे सांगितले. त्यानंतर करुणा सासरी नांदण्यास गेली.

- Advertisement -

सासरच्या मंडळींची करुणाला दमदाटी

त्यानंतर दोन महिन्यांनी करुणाच्या आईवडिलांनी तिला पंचमी सणासाठी २ ऑगस्ट रोजी घेऊन माहेरी आले. त्या दरम्यान १२ ऑगस्ट रोजी करुणा हिच्या पतीने कामशेत पोलीस ठाण्यात करुणा व तिच्या आईवडिलांच्या विरोधात तक्रार देऊन स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी करुणाचा भाऊ अक्षय वाघमारे हा बहिणीच्या सासरच्या मंडळींची समजूत काढण्यासाठी कामशेत येथे गेला असता त्याच्याकडेही ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर पाच लाख रुपये देण्याची ऐपत नसल्याचे करुणा हिने वेळोवेळी सांगितल्याने पती व सासरच्या मंडळींने शिवीगाळ करत व दमदाटी करून करुणा हिला मारहाण देखील केली.

६ जणांविरोधात गुन्हा दाखल

त्यामुळे शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अखेर करुणा हिने भिवंडीतील माहेर गाठले व पती राजेश याच्यासह सासू, सासरा, दीर, नणंद आदी ६ जणांच्या विरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय डोके करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -