घरमुंबईपालिकेची प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई; तरीही पुन्हा जनजागृती

पालिकेची प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई; तरीही पुन्हा जनजागृती

Subscribe

मुंबईत तब्बल एक वर्षापूर्वी प्लास्टिक पिशवी व थर्माकोल बंद लागू करण्यात आलेली असून सुरुवातीच्या काळात जनजागृती करून नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर २ ऑक्टोबरपासून बंदी लागू केल्यानंतर मुंबईत प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिम राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या मुंबईत प्लास्टिक बंदी लागू झालेली असताना पुन्हा जनजागृती मोहिम राबवून महापालिकेने आपली निष्क्रियता सिध्द केली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू करून १५ महिने उलटले. परंतु आजवर महाराष्ट्रासह मुंबई प्लास्टिकमुक्त झालेली नाही. मात्र, राज्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडालेला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी जाहीर केली. त्याची अंमलबजावणी २ ऑक्टोबरपासून होत असून संपूर्ण देशात प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्याचे केंद्राचे फर्मान असल्याने मुंबईतही महापालिकेच्या बाजार, दुकाने आणि आस्थापने तसेच परवाना विभागाच्यावतीने मंगळवारी प्लास्टिक मुक्तीबाबत प्रबोधन व जनजागृती तसेच याबाबत सामुहिक शपथ विविध ठिकाणी घेण्यात आली. मुंबईत आजवर सुमारे १३ लाख दुकानांची तपासणी करून सुमारे ७५ हजार किलो प्लास्टिकचा साठा जप्त करूनही मुंबई प्लास्टिकमुक्त करण्यात यश आलेले नाही.

- Advertisement -

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुंबईसह राज्यात २३ जून २०१८ पासून प्लास्टिक बंदी लागू केली. परंतु मुंबई वगळता राज्यातील अन्य शहरांमध्ये याचा परिणाम दिसून आला नाही. मुंबईत सुरुवातीच्या काळात जनजागृती मोहिम राबवण्यात आल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आल्यास त्यांना ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत या कारवाईतून सुमारे ४ कोटी रुपये वसुल करण्यात आला आहे. परंतु मुंबई प्लास्टिक बंदी लागू असतानाही केवळ केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत महापालिकेने प्लास्टिक बंदीबाबज जनजागृती मोहिम राबवली. त्यामुळे जर आता जनजागृती मोहिम राबवता, तर मग मुंबईत प्लास्टिक पिशव्यांबाबत कारवाई का केली, असा सवाल दुकानदारांकडून केला जात आहे.

- Advertisement -

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिकेच्या सर्व विभागांत प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधनक करणे तसेच त्या अनुषंगाने शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याशिवाय स्वच्छता मोहिम असेही विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबईभर एकूण ५५ कार्यक्रम राबवण्यात आले होते. तब्बल २०० हून अधिक ठिकाणी शपथ घेण्यात आली आहे. यामध्ये सुमारे २ लाख नागरिक सहभागी झाल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -