घरमुंबईकोकण सरस प्रदर्शनाचे उद्घाटन

कोकण सरस प्रदर्शनाचे उद्घाटन

Subscribe

महिला सक्षमीकरणासाठी बचतगट समूहाच्या माध्यमातून महिला उद्योजिका तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केले. कोकण विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते ३० डिसेंबर या कालावधीत कोकण सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्बन हाट, सी.बी.डी. बेलापूर येथे आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी आमदार मंदा म्हात्रे यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धशाळा समिती सभापती किशोर जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने, रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, प्रकाश देवऋषी, सह व्यवस्थापकीय संचालक (म. प) दिपाली देशपांडे, उप संचालक राज्य ग्रामीण गृह निर्माण कक्ष मंजिरी टकले, उप संचालक म. रा. ग्रा. जि. अ. श्री. जोगदंडे, उप संचालक म. रा. ग्रा. जि. श्री. खंदारे, सहायक आयुक्त विकास मनिषा देवगुणे , मुख्य लेखा व वित्ताधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील, उप मुख्य कार्यकारी (पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे, कार्यकारी अभियंता (लघु पाटबंधारे) माणिक इंदूरकर, कार्यकारी अभियंता (बांधकाम) नितीन पालवे, समाजकल्याण अधिकारी रमेश अवचार, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

या विक्री प्रदर्शनात ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध उपयोगी वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये उडीद पापड, हातसडीचे तांदुळ, वारली पेटींग, आर्युवेदिक वनस्पती तेल व उत्पादने, सुकी मासळी, ताडगोळे, कापडी बॅगा, मेणबत्ती, निलगिरी तेल, नाचणी भाजणी पीठ, क्रियेटीव्ह पॉटरी, डिझायनर वुडवर्क, तांबे पितळीची भांडी, बांबु वेतकाम, कागदी डिश, काजूगर, कोकम सिरप, आंबा पोळी, पोहयाचे पापड, लोणची, फॅन्सी ज्वेलरी, मसाले, बांबुपासून बनविलेल्या विविध वस्तू, काथ्याच्या वस्तू इत्यादी उत्पादने या प्रदर्शनास विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. या विक्री प्रदर्शनात ठाणे-40, पालघर-20, रायगड-20, रत्नागिरी-14, सिंधुदूर्ग-14, इतर विभाग-10 व इतर-7 असे एकूण 105 उत्पादन व 20 खानावळ असे एकूण 125 महिला स्वयं सहायता समूहांनी सहभाग नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -