घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत विविध व्यवसायांचा शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत विविध व्यवसायांचा शिंदेंच्या हस्ते शुभारंभ

Subscribe

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फुड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या.

मुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फुड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह उपस्थित होते. (Inauguration of the businesses of the beneficiary entrepreneurs by the CM Eknath Shinde)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ येथे निवड झालेल्या सहा उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आली. यामध्ये आशिष जाधव, हर्षाली धनगर, भरत गांजले, रूपाली साखरे, लक्ष्मण शिंदे आणि विनोद राऊत यांचा समावेश होता. अन्न व्यवसाय आणि प्रवासी वाहतूक सुरू केलेल्या 60 उद्योजकांच्या व्यवसायाचा आज शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात शोभा भंडारे, उत्कर्ष तारी, रूपाली सालेकर, स्नेहा आव्हाड आणि उमेश सोनवणे यांना वाहनाच्या चाव्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.

- Advertisement -

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासह 14 जिल्ह्यातील जिल्हा बँकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती होती.


हेही वाचा – मुंबईत गोवर रुग्णसंख्या १८४; संशयित रुग्णसंख्या १,२६३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -