घरमुंबईअंधेरी पूल दुर्घटनेतील दुसरा बळी; मनोज मेहता यांचं निधन

अंधेरी पूल दुर्घटनेतील दुसरा बळी; मनोज मेहता यांचं निधन

Subscribe

अंधेरी गोखले पूल दूर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता यांची मृत्यूशी झुंज संपली आहे. गेले २७ दिवस मनोज यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर रविवारी त्यांचा मृत्यू झाला आहे.

अंधेरी गोखले पूल दूर्घटनेत जखमी झालेल्या मनोज मेहता (५२) यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. गेले २७ दिवस मनोज यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, रविवारी सायंकाळी ७.३० वाजता नानावटी रुग्णालयातील डॉक्टरांनी मनोज मेहता यांना मृत घोषित केलं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. अस्मिता काटकर यांचा देखील या पुल दुर्घटनेत उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. अंधेरी गोखले पूल या दूर्घटनेत दोन जणांचे बळी गेले आहेत.

पूल दुर्घटना कशी घडली?

मंगळवार, ३ जुलै रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास अंधेरी आणि विलेपार्लेतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल अचानक कोसळला. या घटनेत पाच प्रवासी जखमी झाले होते. या दुर्घटनेत मनोज मेहता हे या पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र अनेक अवयव निकामी झाल्याच्या कारणांमुळे त्यांचे निधन झालं असल्याचं नानावटी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि मनोज मेहता यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. तर व्दारकाप्रसाद शर्मा आणि अस्मिता काटकर यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर गिरीधारी सिंग आणि हरीष कोळी हे देखील अपघातात जखमी झाले होते. या दुर्घटनेत मनोज मेहता आणि अस्मिता काटकर यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मनोज मेहता यांच्याविषयी…

मनोज मेहता यांनी राजेश बिल्डर्सच्या माध्यमातून काम करत होते. पालघर – बेईसर या परिसरात त्यांनी ३० – ३५ वर्षांपासून अनेक गृह संकुलांची उभारणी केली आहे. तसेच मेहता यांनी रोटरी क्लब ऑफ पालघरचे काही काळ अध्यक्षपद भूषवलं होते. तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -