घरमुंबईसरकारच्या संवेदना खरच मराठा समाजासोबत आहेत का ?

सरकारच्या संवेदना खरच मराठा समाजासोबत आहेत का ?

Subscribe

आज मराठा समाजाच्या मुलांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाजातील तरूण वर्ग हा उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरकारच्या संवेदना खरच मराठा समाजासोबत आहेत का ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी रविवारी आझाद मैदानातील मराठा आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकारने वेळीच जागे व्हायला हवे. उद्या आम्ही मराठा समाजासोबत आंदोलनात उतरू, त्यावेळी सरकारला पळता भुई थोडी होईल असे ते म्हणाले. जर आंदोलन हाताबाहेर गेले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल आणि सरकारचाच तो नाकर्तेपणा असेल असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

जेवढ्या शिस्तीचे, कायद्याचे पालन करून हे आंदोलन सुरू आहे, त्यामधून सरकारने मराठा समाजात फूट पडली असे समजू नये. याआधीच मराठा समाजाने लाखोंचे मोर्चे काढून जगाला शिस्त आणि एकी दाखवली आहे. शक्तीचे प्रदर्शन होत नाही म्हणजे एकजुट नाही असे सरकारने समजू नये असाही ईशारा त्यांनी दिला. शासनाला सांगण इतकच आहे की या आंदोलनाला हलक्या पद्धतीने घेऊ नका. राज्य सरकार २१८५ मुलांचा निर्णय कॅबिनेट बैठकीतही घेऊ शकते. कॅबिनेटला अध्यादेश घेऊन निर्णय घेता येऊ शकतो. ओबीसी महिलांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या निमित्ताने त्यांनी राज्य सरकारला ही आठवण करून दिली. आजवर मराठा समाजाने संयम बाळगला आहे. पण अशातच मराठा समाजातील मुलांनीही स्वतःला त्रास करून घेण्याच्या किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये असेही आव्हान त्यांनी केला. मी आमदार म्हणून तुमच्या पाठिशी उभा राहेन असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -