घरमुंबईरस्त्यावरील फायरबरची झाकणे ठरताहेत मृत्यूचे सापळे

रस्त्यावरील फायरबरची झाकणे ठरताहेत मृत्यूचे सापळे

Subscribe

कुर्ला येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील मॅनहोल्सवर बसवण्यात आलेली अनेक फायबरची झाकणे ही पाण्याच्या प्रवाहाबरोबरच निखळली जात असल्याची बाब समोर आली आहे.

दोन वर्षांपूर्वी एलफिन्स्टन रोड येथील सेनापती बापट मार्गावरील मॅनहोल्समध्ये पडून डॉ. दिपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील सर्व मॅनहोल्सवर झाकणे बनवण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. मात्र, ही झाकणे लोखंडी ऐवजी फायबरची बसवण्यात आली आहे. परंतु फायबरची झाकणेच आता मृत्यूचा सापळा बनण्याची भीती निर्माण झाली आहे. कुर्ला येथील लालबहादूर शास्त्री मार्गावरील मॅनहोल्सवर बसवण्यात आलेली अनेक फायबरची झाकणे ही पाण्याच्या प्रवाहाबरोबरच निखळली जात असल्याची बाब समोर आली आहे.

५० हून अधिक झाकणे बसवण्यात आली

मुंबईच्या कुर्ला ते सायन या परिसरातील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील रस्त्यांचे काम करताना मनुष्य प्रवेशिका अर्थात मॅनहोलची झाकणे ही एफआरपीची म्हणजेच फायबरची बसवण्यात आली होती. परंतु ही वजनाला हलकी असल्याने ऐन पावसात पाण्याच्या दबामुळे मॅनहोलच्या बाजूला निघून जातात. त्यामुळे या मार्गावर एकूण ५० हून अधिक झाकणे बसवण्यात आली आहेत. परंतु ही पावसात ही झाकणे म्हणजे मृत्यूचे सापळे बनले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मॅनहोल्समध्ये पडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवून फायबरची झाकणे त्वरीत बदलण्यात यावी. फायबरची झाकणे बदलून त्याऐवजी मजबूत लोखंडी झाकणे बसवण्यात यावी, अशी सूचना केली आहे.

- Advertisement -

चार वर्षांपासून फायबरची झाकणे बसवली

मुंबईतील अनेक रस्त्यांवर यापूर्वी लोखंडी झाकणे बसवली जात असतं. परंतू ही झाकणे चोरीला जात असल्याने महापालिकेने मागील चार वर्षांपासून फायबरची झाकणे बसवण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी डॉ. दिपक अमरापूरकर यांचा मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर पाणी तुंबणार्‍या भागातील पर्जन्य जलवाहिनी तसेच मलवाहिन्यांच्या मॅनहोल्सच्या आतील भागात लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा –

‘दोन हरलेले नेते एकत्र आले की, हरण्याचे दु:ख कमी होते’

- Advertisement -

मुंबईत गिरणी कामगारांसाठी म्हाडाची पाच हजार घरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -