घरCORONA UPDATECoranaVirus: जसलोक हॉस्पिटलची ओपीडी बंद, परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

CoranaVirus: जसलोक हॉस्पिटलची ओपीडी बंद, परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलमध्येही आयसोलेशन सेंटर सुरू झाले आहेत. त्यामुळे, खासगी हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्ण येण्यास सुरुवात झाली असून जसलोक हॉस्पीटल प्रशासनाने ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर खासगी हॉस्पिटलमध्येही आयसोलेशन सेंटर सुरू झाले आहेत. त्यामुळे, खासगी हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्ण येण्यास सुरुवात झाली आहे. यातील धोका लक्षात घेता जसलोक हॉस्पीटल प्रशासनाने ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील परिचारिकेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने तिला क्वारंटाइन करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, अत्यावश्यक रुग्ण सेवा सुरू राहणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

काय आहे प्रकरण

जसलोक हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये अनेक प्रकारच्या आजाराचे रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या कोरोनासाठी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्षही सुरू झाले आहे. त्यामुळे कोरोना संशयित आणि बाधित रुग्णही हॉस्पिटलमध्ये येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोव्हिड १९ ची लक्षणे असणारा एक रुग्ण जसलोकमध्ये दाखल झाला होता. सुरुवातीला फक्त लक्षण वाटणारा हा आजार लगेच बळावला. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. तर चाचणीच्या अहवालात तो रुग्ण‌ पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्याला त्वरीत आयसोलेशन वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. यावर काही स्टाफ आणि डॉक्टरांना तपासणी करून क्टारंटाइनचा सल्ला देण्यात आला. यातील चाचणीत एक परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

मुंबईत अजूनही सर्वाधिक रूग्ण

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढता दिसत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता महाराष्ट्राची चिंता अधिक वाढली आहे. कारण महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा ३०२ झाला आहे. तर एकट्या मुंबईत ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -