घरमुंबईशेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येत, जयंत पाटलांची टीका

शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येत, जयंत पाटलांची टीका

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल चढवलाय.

राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेल्यानं शेतकरी अगदी कोलमडून गेलाय. अचानक पडलेल्या लिंबूच्या आकारएवढ्या गारांनी शेतकऱ्यांचे शेतीचे पुन्हा मोठे नुकसान झालं आहे. आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळे आधी अवकाळी आणि आता गारपीट अशा दुहेरी संकटात राज्यातला शेतकरी वर्ग सापडला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रीमंडळासह अयोध्यच्या दौऱ्यावर गेले. यावरून आता विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

राज्यातला बळीराजा संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय. यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुद्धा राज्य सरकारवर हल्लाबोल चढवलाय. “राज्यातला शेतकरी संकटात असताना राज्य सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसले. महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत सरकारला काहीही देणंघेणं नाही. देवदर्शनासाठी अख्खं सरकार गेलेलं हे पहिल्यांदा घडलं आहे.”, अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज्य सरकारचा समाचार घेतलाय.

- Advertisement -

आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला आले असता जयंत पाटील यांना माध्यमांनी काही प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी सरकारच्या अयोध्या दौर्‍यावर ही टीका केलीय. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्य सरकारची दिसत नाही. राज्यातील शेतकरी, शेतमजूर संकटात असताना अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला असताना, अशावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती मात्र सरकार अयोध्येला जाऊन बसले आहे. पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो आहे. त्यामुळे या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नाही. म्हणूनच ते महाराष्ट्राबाहेर फिरण्याचे काम व त्याला प्रचंड प्रसिद्धी देण्याचे काम करतेय असा थेट हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.

जेपीसीची मागणी करत असताना समितीत सत्ताधारी लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निष्कर्ष त्यांच्या हातात असतो. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नियुक्त केली आहे. ती कमिटी चांगल्या प्रकारे चौकशी करेल हा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे बाकी वेगळे काही नाही, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मांडले.

- Advertisement -

तसंच डिग्री आहे म्हणून ते पंतप्रधान झाले असे म्हणण्याचे कारण नाही. पंतप्रधानांनी डिग्री आहे असे सांगितले तर त्या डिग्रीची चिकित्सा पब्लिक डोमेनमध्ये आल्यावर होणारच. या देशातील नागरीक आपापल्या मार्गाने चिकित्सा करत आहेतच. त्यांची डिग्री आहे म्हणून त्यांना पंतप्रधान केले नाही. पण त्यांनी एकदा ही माझी डिग्री आहे असे सांगितले तर त्याची चिकित्सा होणारच. लोकशाहीत लोकांमध्ये आलेल्या चर्चेची चिरफाड होणे व वेगवेगळी मते व्यक्त होणे, त्याचा खरेपणा किंवा खोटेपणा प्रसिद्ध होणे, त्यावर लोकांनी मते मांडणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ज्यांची डिग्री आहे ती माझी आहे की नाही यावर कोणतेही भाष्य पंतप्रधान करत नाही तोपर्यंत ही मतमतांतरे आणि लोकं चर्चा करणारच, ते कोण थांबवू शकत नाही असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापला आहे. भाजीपाला, गहू, मका, कलिंगड अशी पीकं अवकाळीच्या तावडीत सापडल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचा कसा असा प्रश्न पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -