घरताज्या घडामोडीकसबा पेठनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी धंगेकरांच्या नावाची चर्चा? भाजपचं टेन्शन वाढलं

कसबा पेठनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी धंगेकरांच्या नावाची चर्चा? भाजपचं टेन्शन वाढलं

Subscribe

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून येथे निवडणुकीच्या मैदानात कोण उतरणार?, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या राजकीय चर्चांमध्ये कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव पुढे येत आहे. काँग्रेसकडून या जागेवर धंगेकरांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. दरम्यान, भाजपचं देखील टेन्शन वाढलं आहे.

आमदार रविंद्र धंगेकर यांनी पंढरपूरच्या दौऱ्यादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी धंगेकर म्हणाले की, भाजपने निवडणूकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्यामुळे भाजप आणि मोदी सरकार विरोधात देशात आणि राज्यात मोठी लाट तयार झाली आहे. त्यामुळे जनता मोदी सरकारला त्यांच्या मूळ ठिकाणावर नेऊन ठेवेल असे धंगेकर म्हणाले.

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि व्यापारी यांचे एकही काम केले नाही. उलट महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. परंतु पुणे लोकसभेची पोटनिवडणूक आपण लढवणार नाही, असं स्पष्टीकरण रविंद्र धंगेकर यांनी दिलं आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून भाजपात खलबतं सुरू झाली आहेत. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे या तीन नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे आणि मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. त्यामुळे भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

भाजपने कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसला होता. गेल्या 20-22 वर्षापासून कसब्यावर वर्चस्व असलेल्या भाजपला या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. यावेळी टिळक कुटुंबीयांना डावलल्याने मतदारांनी हा रोष व्यक्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होऊ नये, म्हणून भाजपने अत्यंत सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणुकीतही काँग्रेस रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं जात असून भाजपचं एकप्रकार टेन्शन वाढलं आहे.


हेही वाचा : शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येत, जयंत पाटलांची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -