घरमुंबईरेल्वे प्रशासनाकडून होतेय केडीएमसीची 'कोंडी'

रेल्वे प्रशासनाकडून होतेय केडीएमसीची ‘कोंडी’

Subscribe

रेल्वेकडून पालिकेची काम होत नसल्याची माहिती केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी महासभेत दिली. त्यामुळे काही नगरसेवकांनी पालिकेकडून रेल्वेला पाणी पुरवठा केला जातो तो बंद करावा अशी मागणी केली.

डोंबिवलीतील कोपर पूल बंद करण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून पालिकेला सहकार्य केले जात नाही, रेल्वेकडून एनओसी दिल्या जात नाही. त्यामुळेच अनेक कामे रखडली आहेत अशी माहिती केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी महासभेत दिली. दरम्यान पालिका आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाविषयीच्या नाराजीचा पाढा महासभेत कथन केल्यानंतर काही नगरसेवकांनी पालिकेकडून रेल्वेला पाणी पुरवठा केला जातो तो बंद करावा अशी मागणी केली.

..यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होणार

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर ब्रीज २८ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होणार असल्याने नगरसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, कोपर ब्रीज १९८० रोजी बांधण्यात आला आहे. अंधेरीतील ब्रीज कोसळल्याची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोपर ब्रीजचे इन्सपेक्शन केले होते. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर मुंबईत पुन्हा दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबईत ठाणे परिसरातील ब्रीजची आयआयटी मार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी आआयटीने धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – पालिकेमुळेच कल्याण-डोंबिवली रिंगरूटचे काम सुरू होईना!


 

- Advertisement -

रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी 

पुन्हा पालिका आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर पालिका प्रशासनाने रेल्वे अधिकाऱ्यांसोबत अनेकवेळा बैठका घेतल्या. पालिका प्रशासनाकडून पुलाचा खर्च केल्याचेही कबूल केले. मात्र १९८० च्या वेळच्या करारनाम्याची मागणी केली असता अजूनही देण्यात आलेला नाही. यासंदर्भात तांत्रिक बाबीची पूर्तता आवश्यक आहे. मात्र रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी बोडके यांनी व्यक्त केली.

अजूनही रेल्वेकडून दिली जात नाही एनओसी 

तसेच कल्याण पूर्वेतील एफओबीच्या रिपेअरींगचे कामही रखडले आहे. एफओबीच्या दुरूस्तीच्या कामाला दीड ते दोन कोटी रूपये खर्च येणार आहे. सदर पूल हा अडीच मीटर आहे. मात्र भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पुल सहा मीटर करणे आवश्यक असल्याचे रेल्वेला कळविण्यात आले आहे. दुरूस्तीला दीड कोटी खर्च करण्यापेक्षा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही रेल्वेकडून एनओसी दिली जात नाही. ठाकुर्ली पुलासंदर्भातही रेल्वेचे आरपीएफ ऑफीस हलविण्यासंदर्भात पालिकेकडून रेल्वेला सुचित करण्यात आले आहे. मात्र अजूनही रेल्वेकडून उत्तर मिळाले नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.


हेही वाचा – कडोंमपाचे नगरसेवक घाबरले, ‘म्हणे पाटीसुद्धा झाकून ठेवावी लागते’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -