Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉलिवूडमधील आणखी एक कपल विभक्त

बॉलिवूडमधील आणखी एक कपल विभक्त

किर्तीच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने पती साहिल सहगलसोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी माहितीदेतानाची एक पोस्ट किर्तीने तिच्या इंन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. किर्तीच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोस्टमध्ये किर्तीने असे म्हणले आहे की, मी आणि साहिल ने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त कागदोपत्रीच नाहीतर खऱ्या आयुष्यातही हा निर्णय घेणे खूप कठीण गेले. कोणासोबत एकत्र राहण्यापेक्षा त्यापासून विभक्त होणे अधिक कठीण आहे. आमच्या दोघांसाठीही हा निर्णय घेणे सोपे नव्हते. पण जे आहे ते बदलले जाऊ शकत नाही. माझी काळजी करणाऱ्या सर्व लोकांना सांगते की मी ठीक आहे. यानंतर याबाबत मी कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही. अशाप्रकारची भावूक पोस्ट किर्तीने शेअर केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kirti Kulhari (@iamkirtikulhari)

साहिल आणि किर्ती हे एकत्र जाहिरातीत काम करत होते यादम्यानच दोघांची ओळख झाली आणि हे दोघे एकमेकांना डेट करु लागले. या मैत्रीच्या नात्यातून हे दोघे २०१६ लग्नबंधनात अडकले. आता लग्नाच्या पाच वर्षानंतर हे दोघं हे नाते तोडून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. किर्तीने २०१० मध्ये ‘खिचडी’ या मालिकेतून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. किर्ती नुकतच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात ती पोलिस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारताना दिसली.


- Advertisement -

हे वाचा- Dadasaheb Phalke Award 2021: रजनीकांत यांच्यावर राजकीय नेत्यांसह बॉलिवडमधूनही शुभेच्छांचा वर्षाव

- Advertisement -