घरमुंबईकोरियन युट्यूबर तरुणीला वाचवणारे 'ते' तरुण कोण?

कोरियन युट्यूबर तरुणीला वाचवणारे ‘ते’ तरुण कोण?

Subscribe

मुंबईतील खारमध्ये एका कोरियन युट्यूबर तरुणीचा विनयभंगाची घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. देशासह जगभरातील माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. मात्र हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचून सुमोटो कारवाई करेपर्यंत या तरुणीच्या मदतीला मुंबईतील दोन तरुण धावून आले. या तरुणांना स्वत: ही कोरियन युट्यूबर भेटली असून त्यांचे तिने आभार मानले आहेत. त्यामुळे या कोरियन युट्यूबरला मदत करणारे हे दोन तरुण कोण आहेत आणि ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे जाणून घेऊ.

बुधवारी मुंबईच्या खारमधील रस्त्यावर एका कोरियन युट्युबर तरुणी भटकंती करत होती. यावेळी ती आपल्या युट्यूबर चॅनलवरून फॉलोवर्सची लाईव्ह बोलत होती. तिचे लाईव्ह स्ट्रीम सुरु असताना अचानक एक तरुण तिच्या जवळ आला आणि तिची छे़डछाड करू लागला, यावेळी त्याने तिच्या हाताला पकडून तिचे चुंबन घेतले. तसेच तिला जबरदस्तीने आपल्या स्कुटीवर बसवण्याचा प्रयत्न केला. या घटनेवेळी त्याच्या आजूबाजूला अनेक जण होते मात्र तिची कोणी मदत केली नाही. यावेळी एक तरुण तिथे धावून आला आणि त्याने छेडछाड करणाऱ्या दोघांना हूसकावून लागले आणि तिला वाचवले.

- Advertisement -

त्याचवेळी तिचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहणाऱ्या एका युजरने तिच्या छेडछाडीची एक व्हिडीओ क्लिप कट करून ट्विटवर शेअर केली, ही व्हिडीओ त्याने मुंबई पोलिसांना टॅग करत छेडछाड करणाऱ्या आरोपींना शिक्षेची मागणी केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओची प्रकरणी खार पोलिसांनीही तात्काळ दखल घेत मोबिन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्री आलम अन्सारी या आरोपींना अटक केली. आणि त्यांच्यावर 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

मात्र कोरियन युट्युबर तरुणीला मदत करणारे ते दोन भारतीय तरुण कोण आहेत अशा चर्चा रंगतेय. अशात या तरुणीनेच आता तिला मदत करणाऱ्या दोन्ही तरुणांसोबत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. आदित्य आणि अथर्व अशी या तरुणांची नाव असून त्यांच्यासोबत कोरियन महिलेने जेवण करतानाचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले. कोरियन युट्यूबरने दोघांसोबतचा एक फोटो ट्विट करत लिहिले की, व्हिडिओ पोस्ट करत आणि मला रस्त्यावरून छेडछेडीपासून वाचवणाऱ्या दोन सज्जन भारतीयांसोबत लंच केलं. आदित्य आणि अथर्व. यात आजही तिने तिला मदत करणाऱ्या आदित्य टिक्कासोबत कॉफी घेतली. याचा फोटो तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

दरम्यान संबंधित कोरियन तरुणी गेल्या तीन आठवड्यांपासून मुंबईत राहतेय. मात्र या घटनेने न घाबरता तिने अजून काही दिवस राहत अप्रतिम भारत दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र इतर देशांमध्येही अशाच प्रकारच्या अनुभवांचा सामना करावा लागला होता. परंतु भारतात याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तत्परतेचे तिने कौतुक केले आहे.


दिल्ली, मुंबई, चेन्नईमध्ये ईडीचे छापे; कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -