घरमुंबईकुर्ला भाभा रुग्णालयात असुविधा, नगरसेविका, रुग्णांचे ठिय्या आंदोलन

कुर्ला भाभा रुग्णालयात असुविधा, नगरसेविका, रुग्णांचे ठिय्या आंदोलन

Subscribe

मुंबईत कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार व महापालिका जीवाचे रान करीत असताना दुसरीकडे महापालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात ‘आयसीयू बेड’ची कमतरता भासत असून ऑक्सिजन आणि पाणी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ.सईदा खान व काही रुग्णांनी मिळून साहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालय प्रशासन चांगलेच हादरले असून पालिका सज्ज असल्याचा दावाही फोल ठरला आहे.

मुंबईत गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. मात्र पालिकेने विविध उपाययोजना करून कोरोनाला जानेवारी २०२१ पर्यंत नियंत्रणात ठेवले. मात्र सरकार व पालिका यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर नागरिकांची बेफिकिरी वाढली. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव या नववर्षात म्हणजे फेब्रुवारी २०२१ ला वाढला. हळूहळू कोरोनाच्या रुग्ण संख्येत अनपेक्षितपणे अधिकच वाढ झाली. त्यामुळे पालिकेला या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करणे भाग पडले आहे.

- Advertisement -

कोरोनाची दुसरी लाट आल्याने सरकार व पालिकेने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा केला. मात्र काही रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून व भाजपकडून करण्यात येत आहेत. कुर्ला भाभा रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी अद्याप आयसीयू सुरू करण्यात आलेले नाही. रुग्णांना पाणी मिळत नाही. रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आल्यास त्यांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही. गेले दीड महिना रुग्णालयात औषधे नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी केला आहे.

याबाबत पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे हाल होत आहेत. या घटनाप्रकाराची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी, या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात आंदोलन केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -