लालबागचा राजा परिसरातील १०० दुकांनांना परवानगी, प्राणप्रतिष्ठापनेस सुरूवात

lalbaugcha raja 2021

लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांमधील वादामुळे विलंब झाला. पण पोलिस, लालबागचा राजा आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चेतून तोडगा काढण्यात आल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. याठिकाणी १४४ नुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. पण स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या विनंतीमुळे १०० दुकानदारांना एक मालक आणि नोकर अशा स्वरूपाने परवानगी देण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबतचा सुधारीत आदेश काढण्यात येईल असेही ते म्हणाले. त्यानंतर लालबागच्या राज्याच्या प्राणप्रतिष्ठापनेस सुरूवात झाली. लालबागच्या राजाचे दर्शन आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाले आहे. (Lalbaugcha Raja pendal premises allowed 100 shops says Mumbai police joint commissioner vishwas nangare patil)

#Live : Lalbaugcha Raja 2021: Live Darshan, First Look, Online Aarti

#Live : Lalbaugcha Raja 2021: Live Darshan, First Look, Online Aarti
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८८ वे वर्ष साजरे करत आहे. शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा होणारा आहे. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन भविकांना यंदा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे लागणार आहे. भाविकांसाठी लालबागच्या राजाच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, September 9, 2021

 

याठिकाणी भाविकांनी गर्दी करू नये या उद्देशानेच मुंबई पोलिसांनी दुकान बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या माध्यमातून दिले होते. पण या आदेशामुळे व्यापारी आणि दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली होती. परिणाम लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापनेतही विलंब झाला. अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः याठिकाणी पोहचत हा विषय सोडवला. मुखदर्शन तसेच मंडपातील दर्शन बंद असल्याने गर्दी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच एका रांगेतील ४७ दुकाने तर दुसऱ्या रांगेतील ४६ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या निर्णयाला विरोध झाल्याने अखेर मंडळाचे सुधीर साळवी, दगडू सकपाळ आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या प्रकरणात तोडगा निघाला.

सुधारीत आदेश हे १० दिवसांसाठी लागू असतील, असे विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सकाळी दहा आणि सायंकाळी दहा तसेच तीन तंत्रज्ञ इतक्याच व्यक्तींसाठी परवानगी देण्यात आली असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. मंडळाकडूनही या आपत्तीच्या काळात नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. लालबागच्या राजाचे दर्शन हे ऑनलाईन पद्धतीने भाविकांनी घ्यावे असे आवाहन मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी केले आहे.