घरमुंबईचैत्यभूमीवर लोटला भीमसागर; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी तर सुरक्षिततेसाठी 'ड्रोन'चा वापर

चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी तर सुरक्षिततेसाठी ‘ड्रोन’चा वापर

Subscribe

राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, सर्वपक्षीय नेते यांचे अभिवादन

मुंबई  -: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा ‘निळा सागर’ लोटला होता. “जबतक सूरज चांद रहेगा बाबासाहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, अशा घोषणा देत लाखो अनुयायी यांनी दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसर दणाणून सोडला. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली. तर मुंबई महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा प्रथमच ‘ ड्रोन’ चा वापर केला.

यावेळी, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर आदी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी उपस्थिती दर्शवून चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी, मुंबई महापालिकेने सालाबादप्रमाणे यंदाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विविध सेवासुविधा पुरवून संपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच, महापालिकेच्या जोडीला मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन, बेस्ट उपक्रम, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, घनकचरा, मलनि:सारण विभाग, वाहतूक पोलीस विभाग आदींनीही पुढाकार घेत आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा आदी संबंधित अधिकारीं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सेक्रेटरी नागसेन कांबळे आदींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

- Advertisement -


mahaparinirvan diwas dadar 2022 Flower shower in helicopter drones use for  security

सर्वपक्षीय नेतेमंडळी यांच्याकडून अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधी आदींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये, शिक्षण मंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालकल्याण मंत्री आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.राहुल शेवाळे, खा.श्रीकांत शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी खासदार किरीट सोमय्या, समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू असीम आझमी आदींचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेकडून विविध सेवासुविधा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबई महापालिकेने यंदाही चैत्यभूमी, दादर, शिवाजी पार्क आदी परिसरात तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तसेच, चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या सर्व सेवासुविधांचा लाखो भिम अनुयायी, भन्ते आदींनी लाभ घेतला व पालिकेच्या सेवासुविधा व्यवस्थेबाबत कौतूक केले.

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

मुंबई महापालिका, राज्य शासन व पोलीस यांच्या समन्वयाने सालाबादप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे सायंकाळी ४.१७ वाजल्यापासून चार वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.


mahaparinirvan diwas dadar 2022 Flower shower in helicopter drones use for  security

सुरक्षिततेसाठी ‘ड्रोन’चा वापर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी लाखो अनुयायी यांची चैत्यभूमी, शिवजीपार्क परिसरात गर्दी लोटते. या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी व सुरक्षितततेच्या दृष्टीने दादर रेल्वे स्थानकपासून ते चैत्यभूमीपर्यन्त पोलीस ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. तसेच, यंदा प्रथमच सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिकेतर्फे जी- उत्तर विभागाने ‘ड्रोन’चा वापर केला.

अनुयायी यांच्यासाठी मोफत अल्पोपहार

यावेळी, दादर रेल्वे स्थानकापासून ते शिवाजी पार्क परिसरात बेस्ट उपक्रम, राजकीय नेते, सामाजिक संस्था, आंबेडकरी संस्था आदींनी देशभरातून आलेल्या अनुयायी यांच्यासाठी सकाळपासूनच चहा, नाश्ता, जेवण, पाणी, बिस्कीट, खाद्यपदार्थ आदींची व्यवस्था केली होती.

आंबेडकरी साहित्य खरेदीसाठी झुंबड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन केल्यावर घरी परतणाऱ्या अनुयायी यांनी दादर परिसरात पदपथावर मांडण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, मूर्ती, पुस्तके, कॅलेंडर, निळे उपरणे, बॅच व इतर वस्तूं आदीं साहित्याची खरेदि करण्यासाठी गर्दी केली होती.


शरद पवारांवर 48 तासात बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही; फडणवीसांचे आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -