घरमुंबईमला तेथे येण्याची वेळ आणू नका, संभाजीराजे छत्रपतींचा कर्नाटकला इशारा

मला तेथे येण्याची वेळ आणू नका, संभाजीराजे छत्रपतींचा कर्नाटकला इशारा

Subscribe

संभाजीराजे छत्रपती यांनीही या घटनेचा निषेध केला. आक्रमक होऊन त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याचा निषेध आहे. महाराष्ट्र याचे जशास तसे उत्तर देईल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

मुंबई: बेळगावजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. सकाळी झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद दिवसभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी चर्चा करुन नाराजी व्यक्त केली.

संभाजीराजे छत्रपती यांनीही या घटनेचा निषेध केला. आक्रमक होऊन त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याचा निषेध आहे. महाराष्ट्र याचे जशास तसे उत्तर देईल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

- Advertisement -

कोल्हापूर येथील लाखो भाविक कर्नाटक येथील सौंदत्ती येथे रेणुकादेवी यात्रेनिमित्त आले आहेत. कर्नाटक सरकारने त्यांची सुरक्षा करावी अन्यथा मलाच कर्नाटकात यावे लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

या घटनेचा निषेध करताना शरद पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणाच्या दिवशी जे काही महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर घडलं ते अत्यंत निषेधार्ह आहे. येत्या २४ तासांत वाहनांवरचे हल्ले थांबले नाहीत तर या संयमाला एक वेगळा रस्ता पाहण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि सरकारवर राहणार आहे.

तर ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केले. ते म्हणाले, कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीने सीमाभागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे आहेत.

अजित पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनीही कर्नाटक सरकारला इशारा दिला. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून नाराजी, चिंता व्यक्त केली आहे. तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की, याप्रकरणी तात्काळ कारवाई केली जाईल.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -