घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत अशी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असेल. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यात संपुर्ण कडक लॉकडाऊन लावण्याबाबतची ही बैठक असेल. राज्यात कोरोनाचे संकट पाहता कोरोना नियंत्रणासाठीच कडक लॉकडाऊनचा पर्याय वापरता येतो का ? याबाबतची चाचपणी करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना लस तुटवड्याचे आव्हान, ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा मर्यादा, रक्ताच्या टंचाईचे संकट अशा अनेक संकटांचा सामना राज्य सरकारला करावा लागत आहे. त्यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या मर्यादेचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या संवादात केला होता. त्यामुळे दैनंदिन कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता आणि कोरोना हाताळण्यासाठी हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकार यापुढच्या कालावधीत अधिक दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे.

राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शनिवारी ही सर्वपक्षीय बैठक होणे अपेक्षित आहे. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियंत्रणाच्या निर्णयासाठी या विरोधी पक्षांकडून नेमकी काय भूमिका घेण्यात येते हे महत्वाचे आहे. राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे केंद्र विरूद्ध असे राजकारण पेटले आहे. महाराष्ट्रात लसीच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे बंद झाली आहेत. अशावेळीच लसीचा ४० लाख डोस इतका पुरवठा द्या अशी मागणी महाराष्ट्राकडून करण्यात येत आहे. पण तुलनेत महाराष्ट्राला लसीचे डोस कमी प्रमाणात येत असल्यानेच महाराष्ट्रातून आणखी लसीच्या डोसची मागणी करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक संकटांनी घेरलेल्या महाराष्ट्रापुढे लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही. एका आठवड्याच्या कालावधीत रूग्णसंख्येत कोणतीही घट न झाल्यानेच मुख्यमंत्र्यांनी आता विकेंड लॉकडाऊन एवजी संपुर्ण लॉकडाऊनचा पर्याय चाचपायला सुरूवात केला असल्याची चर्चा आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -