घरमुंबईवर्षभरात रस्ते अपघातात दीड लाख नागरिकांचा मुत्यू

वर्षभरात रस्ते अपघातात दीड लाख नागरिकांचा मुत्यू

Subscribe

अपघाती मृत्युंमध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

देशभरात रस्ते अपघातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८मध्ये देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी संपूर्ण देशात ४ लाख ६७ हजार ४४ अपघातांमध्ये १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला. तर ४ लाख ६९ हजार ४१८ जण जखमी झाले आहेत.अपघाती मृत्यूंच्या संख्येत उत्तर प्रदेशचा पहिला क्रमांक (१४.७ टक्के) तर महाराष्ट्रच्या दुसर्‍या (८.८ टक्के) क्रमांकावर आहे.

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात २०१८ मधील अपघातांची माहिती देण्यात आलेली आहे.अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील तरूण जास्त आहेत. त्यात पुरुषांची संख्या १ लाख ३० हजार १४४ तर स्त्रियांची संख्या २१ हजार २७३ इतकी आहे. हेल्मेट घातले नसल्यामुळे ४३ हजार ६१४ तर सीटबेल्ट लावला नाही. म्हणून २४ हजार ४३५ जणांना आपला जीव गमावला लागला आहे. अपघात होण्यामागे वेग हे मुख्य कारण आहे. वेगाने गाडी चालविल्यामुळे ९७ हजार ५८८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रस्ता अपघातांच्या तुलनेत वेगाने गाडी चालविल्यामुळे होणार्‍या अपघातांचे प्रमाण ६४.४ टक्के इतके सर्वाधिक आहे.

- Advertisement -

अपघातांमध्ये मोटरसायकल चालकांची संख्या मोठी आहे. गेल्यावर्षी ५५ हजार ३३६ मोटरसायकल चालकांचा विविध अपघातात मृत्यू झालेला आहे.गेल्यावर्षी हीट अ‍ॅण्ड रनच्या सर्वाधिक ६९ हजार ८२२ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यामध्ये २८ हजार ६१९ जणांचा मृत्यू तर ६१ हजार ९८८ जण जखमी झालेले आहेत. हीट अ‍ॅण्ड रन प्रकरणांमध्ये २०१७ च्या तुलनेत ७.१ टक्यांनी वाढ झालेली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -