घरमुंबईभिवंडीत प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये आढळला निर्वस्त्र मृतदेह

भिवंडीत प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये आढळला निर्वस्त्र मृतदेह

Subscribe

पतीने चारित्र्याच्या संशयाने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भिवंडीत पतीने चारित्र्याच्या संशयाने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पती हमीद मदरअली सरदार (२७) याला भिवंडी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमके काय घडले?

भिवंडीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे येथे मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन रोडवर २५ वर्षीय वयोगटातील अनोळखी महिलेचा आठ दिवसांपूर्वी तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचे समोर आले. या महिलेचे हात, पाय आणि मुंडके छाटून निर्वस्त्र मृतदेह प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये फेकून दिला होता. तर हात, पाय आणि मुंडके हे अवयव प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ताडाळी (फेणापाडा) येथील एका नाल्यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. देवजीनगर येथे राहणारी सायरा हमीद सरदार (२७) असे निर्घृण खून झालेल्या महिलेचे नांव आहे. सदर महिलेची हत्या तिचा पती हमीद मदरअली सरदार (२७) यानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

असा झाला खूनाचा उलगडा

सरदार दांपत्य मूळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी असून तो देवजीनगर येथे वास्तव्यास होता. हमीद हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. पती हमीद हा कामावर निघून गेल्यानंतर ती घरातून निघून जात असे त्यामुळे तिला वारंवार समजावून देखील ती ऐकत नसल्याने संतापलेल्या हमीद याने तिचा कोयत्याने गळा, उजवा हात आणि दोन पाय गुडघ्यापासून कापून ते भाड्याच्या टेंपोद्वारे फेणापाडा येथील पाईपलाईनच्या नाल्यात तर धड प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सोनाळे हद्दीत फेकून दिले होते. विशेष म्हणजे मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी मारेकरी हमीद याने निर्वस्त्र मृतदेह एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून तो सोनाळे गांवच्या हद्दीतील मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन लगत असलेल्या सह्याद्री रेडिमिक्स प्लांटच्या समोर फेकून दिला होता. या खून्याचा तपास करण्यासाठी पोलिसांपुढे ठोस पुरावा नसताना मृतदेह कोंबलेला प्लास्टिक ड्रमचा आधार घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने खुन्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सदरचा प्लास्टिक ड्रम हा तारापूर येथील केमिकल कंपनीतून भिवंडीतील एका डाईंगमध्ये आणण्यात आला होता. तो एका कामगाराने नेवून त्याची विक्री भंगारवाल्याला केली होती. त्याच्याकडून ड्रम हमीद याने खरेदी केला होता. त्या ड्रममध्ये पत्नीची हत्या केलेला मृतदेह कोंबून तो भाड्याने टेंपो खरेदी करून त्यावाटे मृतदेह फेकून दिला होता. सदरचा ड्रमचा प्रवास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी महिलेच्या खूनाचा उलगडा केला आहे.

- Advertisement -

वाचा – घराची किंमत कमी केली नाही म्हणून कोयत्याने वार

वाचा – माथेफिरू फुलवाल्याने ग्राहकावर केला कोयत्याने वार, काय आहे कारण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -