घरमुंबईजे मतदान करणे टाळतात, ते देशाचे अपराधी - मनोहर जोशी

जे मतदान करणे टाळतात, ते देशाचे अपराधी – मनोहर जोशी

Subscribe

'जे मतदान करत नाही, किंवा मतदान करणे टाळतात ते देशाचे अपराधी असल्याचे मत शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

‘जे मतदान करत नाही, किंवा मतदान करणे टाळतात ते देशाचे अपराधी असतात. म्हणून सर्वांनी मतदान करावे, मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदा उन्हाळा जास्त आहे. त्यामुळे काही लोकं मतदान करणे टाळतात. मात्र, मतदान करणे टाळू नका, आपला हक्क बजावा आणि मतदान करा. आजचा दिवस हा देशभक्तीचा असून सर्वांनी मतदान करावे’, असे आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केले आहे.

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार

राज्यातल्या १७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि दक्षिण मुंबई अशा १७ मतदार संघांचा समावेश आहे. तर देशभरातल्या एकूण ९ राज्यांतल्या ७२ मतदारसंघांसाठी मतदान होत असून राज्यातला हा चौथा आणि शेवटचा टप्पा असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण ताकद राज्यात पणाला लावली होती. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे.

- Advertisement -

वाचा – Loksabha election Live Update: पहिल्या दोन तासात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -