घरमुंबईमरिन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवर भव्य विद्युत रोषणाई; नागरिकांच्या सहभागातून २४ लाखांचा निधी

मरिन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवर भव्य विद्युत रोषणाई; नागरिकांच्या सहभागातून २४ लाखांचा निधी

Subscribe

मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारतींवर महापालिकेतर्फे विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी सामाजिक उत्तर दायित्वातून प्राप्त झाला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव देशाबहरात उत्साहाने साजरा एकला आहे आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट २०२२ घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्ताने मुंबईची जागतिक ओळख असलेल्या  क्वीन्स नेकलेस(marine drive) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारतींवर महापालिकेतर्फे विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी होणाऱ्या खर्चापैकी सुमारे ५० टक्के निधी सामाजिक उत्तर दायित्वातून प्राप्त झाला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. या घरोघरी तिरंगा(tiranga) अभियानाला सढळ हस्ते निधी देणाऱ्या देणगीदारांनी गुरुवारी आयुक्त डॉ. इकबाल चहल यांची महापालिका मुख्यालयात भेट घेऊन त्यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा व उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा – ‘घरोघरी तिरंगा’उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

- Advertisement -

घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान मुंबई(mumbai) महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. यानिमित्ताने मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगा स्वरुपातील विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असणार आहे. मरीन ड्राईव्ह येथील २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर महापालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन महापालिकेने यापूर्वीच केले आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रक निर्गमित करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक उत्तर दायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून सहभाग घेण्यासाठी कंपन्यांना निर्देश दिले आहेत. त्या आधारे मरीन ड्राईव्ह परिसर विद्युत रोषणाईसाठी देखील प्रयत्न करावेत, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी केली होती.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियान भारताला नव्या उंचीवर नेईल, मोदींकडून जनतेच्या उत्साहाचं कौतुक

- Advertisement -

‘ए’ विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त म्हणून कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांनी विविध मान्यवरांशी व कॉर्पोरेट कंपन्यांशी संपर्क साधला. मरीन ड्राईव्ह येथील २८ निवासी इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाईसाठी अंदाजे ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता, आयनॉक्स समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ जैन, पार्कसन्स पॅकेजिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ केजरीवाल आणि ज्युपिटर डायकेमचे व्यवस्थापकीय संचालक निमेश चोखाणी या तिन्ही मान्यवरांनी आपापल्या सामाजिक उत्तर दायित्वातून प्रत्येकी ८ लाख रुपये असा एकूण २४ लाख रुपयांचा निधी धनादेश स्वरुपात महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे सुपूर्द केला. आहे. त्यामुळे एकप्रकारे मरीन ड्राईव्ह येथील निवासी इमारतींवरील विद्युत रोषणाईचा निम्मा खर्च या तीन कंपन्यांनी उचलला आहे.

हे ही वाचा – येत्या काळात ‘त्यांचे’ काही एजंट तुम्हाला संपर्क करतील; उद्धव ठाकरेंचे माजी शिवसेनेच्या नगरसेवकांना आवाहन

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -