घरताज्या घडामोडीमुंबईतील गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; 740 संशयित

मुंबईतील गोवरच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; 740 संशयित

Subscribe

कोरोना आणि साथीच्या आजारांनंतर आता मुंबईत गोवर रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत गोवरचे एकूण 740 संशयित रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. या 740 रुग्णांमधील 50 रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोना आणि साथीच्या आजारांनंतर आता मुंबईत गोवर रुग्णांची संख्या वाढते आहे. मुंबईत गोवरचे एकूण 740 संशयित रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. या 740 रुग्णांमधील 50 रुग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील 12 विभागात गोवरची रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. (Massive rise in measles cases in Mumbai 740 suspects)

गेल्या 24 तासात मुंबईत गोवरचे 123 संशयित रुग्ण आढळले असून, अनेक संशयितांना मुंबईतील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोवंडी परिसरात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने विशेष लसीकरण मोहीम सुरु केली आहे. 9 महिन्यांचे बालक आणि 16 महिन्यांच्या बालकांना गोवर प्रतिबंधक लस दिली जाते आहे. मुंबईतील वाढत्या गोवर रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीकडून मुंबईतील अनेक विभागात ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे.


हेही वाचा – उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -