घरमुंबईसण्डे, ब्लॉक डे - मेगाब्लॉकमुळे मुंबईची लाईफलाईन मंदावणार!

सण्डे, ब्लॉक डे – मेगाब्लॉकमुळे मुंबईची लाईफलाईन मंदावणार!

Subscribe

मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

नेमेची येतो पावसाळा या उक्तीनुसार मुंबईकरांसाठी नेमेचि येतो रविवार आणि घेऊन येतो मेगाब्लॉक, हे ब्रीद आता सर्वमान्य झालं आहे. आज देखील मुंबईमध्ये रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यापैकी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असून पश्चिम रेल्वेवर थेट जम्बो ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे आज कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आपला दिवस लवकर सुरू करावा लागणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा, हार्बरवर पनवेल-वाशी तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड-भाईंदर यादरम्यान ब्लॉक घेण्यात येत आहे.

मध्य रेल्वे

माटुंगा ते मुलुंड – डाऊन स्लो – सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२
सीएसटीहून कर्जत-कसाऱ्याच्या दिशेने सुटणाऱ्या स्लो लोकल या स्थानकांदरम्यान फास्ट ट्रॅकवर वळवण्यात येतील.

- Advertisement -

हार्बर रेल्वे

पनवेल ते वाशी – अप आणि डाऊन – सकाळी ११.३० ते दुपारी ४
या स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक बंद असेल.

पश्चिम रेल्वे

वसई रोड ते भाईंदर – अप आणि डाऊन – शनिवार मध्यरात्री १२.३० ते रविवार पहाटे ४
या स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक पूर्ण बंद असल्यामुळे रविवारी लोकल उशिराने धावतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -