मुलांनी मुलीसोबतच्या मैत्रीला सेक्ससाठीची संमती मानू नये, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

तक्रारदार ही २२ वर्षांची तरुणी असून तिची आरोपी व्यक्तीशी फारशी ओळख नव्हती.

Mere friendship with girl is no permission for boy to construe consent for physical relationship said Bombay high court

कोणत्याही मुलीसोबतच्या मुलाच्या मैत्रीला एकप्रकारे सेक्ससाठीची संमती असल्याचे मानू शकत नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे. एका प्रकरणात लग्नाच्या बहाण्याने महिलेशी संबंध ठेवणाऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील एकल खंडपीठाने२४ जून रोजी दिलेल्या आदेशात ही माहिती दिली. लग्नाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या शहरातील रहिवासी आशिष चकोरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

आरोपीविरोधात एफआयआर दाखल

यावर न्यायमूर्ती डांगरे म्हणाले की, “एका मुलीने आपल्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले म्हणून त्या मुलीली मुलाने हलक्यात घेत नये. तसेच तिने मैत्री केली म्हणजे तिने मुलाला शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली असे मानू नये. दरम्यान या प्रकरणातील आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376(2)(n) (संबंधित महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 376(2)(h) (गर्भवती महिलेवर बलात्कार) आणि महिलेची फसवणुकी केल्याचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या अमिषाने तरुणीवर बलात्कार 

तक्रारदार ही २२ वर्षांची तरुणी असून तिची आरोपी व्यक्तीशी फारशी ओळख नव्हती. 2019 मध्ये तरुणीने आरोप केला की, जेव्हा ती आणि तिचा एक मित्र तिसर्‍या मित्राच्या घरी गेले तेव्हा आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले, यावेळी तिने आरोपीला विरोध केला मात्र आरोपीने तिला सांगितले की, त्याला ती खूप आवडते आणि तो कोणत्याही परिस्थितीत तिच्याशीच लग्न करेल. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर गुन्हा दाखल होतात आरोपी चकोरने तरुणीसोबत संमतीने संबंध ठेवले असल्याचे सांगत अटकेपासून संरक्षण मागितले होते.

तरुणी गरोदर राहताच आरोपीचा लग्नास नकार

पीडित तरुणीने सांगितले की, ती सहा आठवड्यांची गर्भवती आहे, मात्र यावेळी आरोपीने तिची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला, तसेच तिच्यावरचं बेवफाईचा आरोप केला. यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशात असे नमूद केले आहे की, पीडित तरुणीने आरोपी तरुणाला लग्नासाठी वारंवार विनंती केली, परंतु त्याने नकार दिला. मे 2019 ते 27 एप्रिल 2022 दरम्यान घडलेल्या कृत्यांचा संदर्भ देत पीडित तरुणीने आरोप केला की, आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले होते. यानंतर तिने आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. यावर उच्च न्यायालयाने सांगितले की, महिलेने तिच्या जबाबात लग्नाच्या आश्वासनावर शारीरिक संबंध ठेवण्यास परवानगी दिल्याचे म्हटले आहे.


संजय राऊतांना ईडीकडून तूर्तास दिलासा, कागदपत्र सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ