घरमुंबईMhada Lottery: स्वप्नातलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! जानेवारीत निघणार मुंबईतील म्हाडा घरांची लॉटरी

Mhada Lottery: स्वप्नातलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! जानेवारीत निघणार मुंबईतील म्हाडा घरांची लॉटरी

Subscribe

मुंबईसारख्या मोठ्या आणि स्वप्नाच्या शहरात स्वतःच लहानसं का असेना हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे महागाईच्या काळात जगत असताना आता परवडणाऱ्या किंमतीत अनेकांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. जानेवारी २०२२ मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. बुधवारी म्हाडाने कोकण विभागाची लॉटरी सुरू केली असून पहिल्या एक तासात ३ हजार लोकांनी या घरांसाठी अर्ज केले होते. तसेच म्हाडाने गेल्या दोन वर्षात काही सवलती दिल्या होत्या, अशी माहितीही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्यानुसार, म्हाडाने २०१७ ते २०१९ यादरम्यान १०६ ऑफर लेटर दिले होते. तसेच सध्या म्हाडाचे ६७ नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. १४ जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत १५०० कोटी रुपये म्हाडाला ८ महिन्यात मिळाले आहेत. त्यामध्ये १४ हजार गाळे, ८ हजार मूळ निवासींचे पुनर्वसन देखील करण्यात आले आहे.

- Advertisement -

दोन वर्षांत १८५ LOI काढण्यात आले. यामधून १७ हजार लोकांना फायदा झाला आहे. एसआरएचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही काही फंड उभा करत आहोत. त्यातून एसआरए प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. एसआरएचे २३० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यातील ११ प्रकल्प न्यायालयीन प्रक्रियेत अडकले असून ५६ म्हाडा वसाहतीत एका-एका बिल्डिंगच्या पुनर्विकासाला आम्ही परवानगी देणार नाही, संपूर्ण वसाहतीचा एकत्र विकास व्हावा, असा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.


पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह मुंबई पोलीस दलातील तीन जणांवर वसुलीचा आरोप

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -