घरताज्या घडामोडीविनयभंग प्रकरण: डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन मंजूर

विनयभंग प्रकरण: डीआयजी निशिकांत मोरेंचा अटकपूर्व जामीन मंजूर

Subscribe

पनवेल तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात फरार असलेले पुण्याचे पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत मोरे यांना सदर जामीन देण्यात आला असून या प्रकरणी संबंधित प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात मोरे यांना हजेरी लावावी लागणार आहे. दरम्यान २९, ३० आणि ३१ जानेवारी मोरे यांना तळोजा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पनवेल येथील सदर प्रकरणामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरात खळबळ माजली. ७ जानेवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर पनवेल कोर्टाच्या परिसरातच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. धमकविणारा इसम हा निशिकांत मोरे यांच्याकडे अनेक वर्षांपासून ड्राइव्हर म्हणून काम करत होता. अद्यापही पीडित मुलीचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

पुणे मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे पोलीस महानिरीक्षक असलेला निशिकांत मोरे यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल झाल्यापासून मोरे फरार झाले. पनवेल न्यायालयाने त्यांचा ७ जानेवारी रोजी अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने मोरे यांच्या जामिनाला तात्पुरती मंजुरी दिली आहे. सदर प्रकरणाच्या तपासाठी जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -

नक्की काय घडले होते?

गेल्या ५ जून २०१९ ला पीडित मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी पोलीस महानिरीक्षक निशिकांत मोरे यांनाही आमंत्रित केले होते. वाढदिवस साजरा करताना भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला. तिच्या चेहऱ्यावर लागलेला केक मोरे यांनी जिभेने चाटला होता. मोरेंच्या पत्नीनेच याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि ती हा व्हिडिओ पीडित मुलीच्या पालकांना पाठवून त्रास देत होती. शिवाय हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, असे आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोप केले आहेत. यामुळे पीडित मुलीने डीआयजी मोरेंविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करू नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे धमक्याही दिल्या जात होत्या.अखेर सहा महिने उलटून गेल्यावर काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरे यांच्यावर पोक्सोअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा – मुलीला छेडत असल्यामुळे तरुणाची भर रस्त्यात हत्या

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -