घरमुंबईमार्चमध्ये मोनोरेल होणार महालक्ष्मीला कनेक्ट

मार्चमध्ये मोनोरेल होणार महालक्ष्मीला कनेक्ट

Subscribe

नव्या ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया पंधरवड्यात

मोनोरेलचा वडाळा ते महालक्ष्मी दरम्यानचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी १ फेब्रुवारीची डेडलाईन हुकणार आहे. मार्चमध्ये हा टप्पा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. या टप्प्यातील सेवा करण्यासाठी ट्रेनची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आहे. एमएमआरडीए नवीन ट्रेनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार आहे. त्यासोबतच काही ट्रेन दुरुस्तीची प्रक्रियाही करण्यात येणार आहे.

चेंबूर ते महालक्ष्मी या संपूर्ण मोनोरेल मार्गावर पूर्ण क्षमतेने मोनोरेलची सेवा चालविण्यासाठी जास्त ट्रेनची गरज एमएमआरडीएला आहे. पुरेशा प्रमाणात ट्रेन उपलब्ध झाल्यास दिवसाला दीड लाख ते तीन लाख प्रवासी वाहतूक करता येईल, असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. सध्या चेंबूर ते वडाळा या टप्प्यात १५ हजार ते २० हजार प्रवासी दररोज मोनोरेलने प्रवास करतात. चार ट्रेन या दुरुस्तीच्या कामासाठी गुंतलेल्या आहेत, तर उर्वरित नवीन ट्रेनसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत ५ ट्रेन सुरुवातीलाच खरेदी करण्यात येतील. तसेच या ट्रेनसाठीचा प्रतिसाद पाहून नवीन आणखी ५ ट्रेन खरेदी करण्यात येणार आहेत. नवीन ट्रेनसाठी निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू होणार आहे. स्कोमी कंपनीचे कंत्राट एमएमआरडीएने रद्द केल्यानंतर स्वतः एमएमआरडीएने मोनोरेल चालवण्यासाठी घेतली आहे. पण, अनेक आव्हानांना सामोरे जात एमएमआरडीएचा या सगळ्या वाहतूक प्रकल्पाच्या व्यवस्थापनामध्ये कस लागत आहे. तांत्रिक आव्हानांसोबतच आर्थिक आव्हाने आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मानव संसाधनाचे आव्हान हे मोठे असल्याची प्रतिक्रिया मोनोरेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एल.एन. मूर्ती यांनी दिली.

- Advertisement -

ट्रेन आणि फ्रिक्वेन्सीही वाढणार
ट्रेनच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्याची मोनोरेलची फ्रिक्वेन्सी वाढण्यासाठी मदत होणार आहे. सध्या तीन मोनो ट्रेन सेवेत आहेत. दुरुस्तीच्या आणखी चार ट्रेन आणि निविदा प्रक्रियेतील पाच ट्रेन यामुळे मोनोरेलची फ्रिक्वेन्सी वाढवण्यावर नक्कीच मदत होईल. नव्या वर्षात पहिल्या दहा दिवसात मोनोची प्रवासी संख्या वाढली आहे. अर्थात याला बेस्ट संप कारणीभूत आहे. पहिल्या दहा दिवसातच ८ लाख रुपयांचा महसूल मोनो रेल्वेला मिळाला आहे, तसेच ४२ हजार प्रवाशांनी या कालावधीत मोनोरेलला प्रवासासाठी पसंती दिली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -