घरमुंबईवर्षानुवर्षे अधिकारी एकाच खुर्चीला चिकटून! पोलिस खात्याचा कारभार

वर्षानुवर्षे अधिकारी एकाच खुर्चीला चिकटून! पोलिस खात्याचा कारभार

Subscribe

कोणत्याही सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांची बदली ही दर दोन वर्षांनी करण्याचा नियम आहे. याला पोलीस खातेही अपवाद नाही. पोलीस खात्यात ४० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी हे तीन-साडेतीन वर्षांपासून राजकीय आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांचे वजन वापरत एकाच जागी असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरातील ६०७ फौजदारांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र त्यांच्यातील अनेकजण अद्याप पूर्वीचे ठिकाण सोडण्यास तयार नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर काही अधिकाऱ्यांना एकाच जागी ठेवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील गृहखात्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तब्बल तीन वर्षे उलटली तरी मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी असलेले देवेन भारती यांचीही बदली झालेली नाही.

दरवर्षी मार्च ते मे या दोन महिन्यांत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. मुलांचे शाळाप्रवेश तसेच बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी इतरही सुविधा उपलब्ध करुन घेण्यात अडचणी येवू नयेत हा यामागचा हेतू असतो. मात्र मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून एकाच जागी तळ ठोकून आहेत. तर १० वर्षांपासून जे अधिकारी मुंबईत आहेत त्यांची सक्तीने बाहेर बदली करुन, बदलीच्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येते. मात्र यापूर्वीच त्यांच्यातील अनेक अधिकाऱ्यांनी गृहखात्याशी राजकीय संधान साधत आपल्या मुंबईबाहेर बदल्या होऊ नयेत, यासाठी वशिला लावला आहे.

- Advertisement -

नुकत्याच बदल्या झालेल्या काही फौजदारांनी आपली पूर्वीची ठिकाणे सोडण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे. अनेकांनी बदली झालेल्या ठिकाणी जाण्याऐवजी रजा घेण्याचा पळपुटा मार्ग पत्करला. मुंबईचे सहआयुक्त देवेन भारती यांच्यासह इतरही अनेक वरीष्ठ पदाधिकारी गेल्या तीन वर्षांपेक्षाही अधिक काळ त्याच जागेवर आहेत. तर क्राईम ब्रँचमधील काही वरीष्ठ अधिकारीही अधिक काळ तेथेच काम करत आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी बदली झालेले अनेक अधिकारी आजही मुंबईतील पोलीस ठाण्यात आणि इतरही शाखांमध्ये त्याच जागेवर काम करत आहेत. त्यांच्यावर वरिष्ठांची मर्जी असून, त्यामुळेच त्यांना बाहेर सोडले जात नसल्याचा आरोप आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना, बदलीच्या ठिकाणी जाण्याच्या तीनदा नोटीसा काढल्या. मात्र या अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या नोटिसांनाही दाद दिली नसल्याचे उघड झाले आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -