घरमुंबईडेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरु

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरु

Subscribe

डेक्कन क्विन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरु झाले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे नेते आशिष शेलार आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. जैन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाकडून डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरत्या ग्रंथालयाचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथालयाच्या शुभारंभावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे नेते आशिष शेलार आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. जैन उपस्थित होते. या गाड्यांमधील मासिक पासधारकांना पुस्तकांची ही आगळीवेगळी सेवा वर्षभर निशुल्कपणे उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे वाचनदूत या दोन गाड्यांमध्ये खास पुस्तकांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॉलीमधून प्रवाशांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करुन देणार आहेत.

तरच अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली ठरेल – विनोद तावडे

‘माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रभावी लिखाणाने देशाच्या युवा पिढीला एक नवीन विचार दिला. भारताची युवा पिढी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींच्या लिखाणामुळे अधिक ज्ञानवंत झाली. कलाम यांची प्रेरणा घेऊन या वाचन प्रेरणा दिनापासून प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट, मोबाईल चे सर्व इलेक्ट्रानिक गॅझेट बाजूला ठेवून काही तास वाचन करावे, हिच ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देशावासिंयाकडून खरी आदरांजली ठरेल’, असे विनोद तावडे यांनी सांगितले. त्याचबरोबर आपल्याकडे मराठी, इंग्रजीमध्ये भरपूर पुस्तके आहेत, साहित्य आहेत आणि ज्याला जे वाचायचे आहे, त्याला तशी पुस्तके उपलब्ध करुन देणे हे सरकारला सहज शक्य आहे. कारण ही पुस्तके वाचून परत घेणार आहे. आपण १२ हजार वाचनालयाला पुस्तके देत असतो, त्यामध्ये ही दोन वाचनालये वाढलेली आहेत. पण चांगली दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करेल, असेही तावडे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

अशी असेल फिरते वाचनालयाची कार्यप्रणाली

ट्रेनमधील वाचनदूत हे तेथील प्रवाशांना भेटून पुस्तक देणार आणि मुंबईहून निघाल्यानंतर पुणेमध्ये गाडीमधून उतरताना पुन्हा जमा करणार. पुन्हा दुसऱ्यादिवशी याचपध्दतीने पुस्तक घेऊन वाचायचे आणि पुन्हा पुस्तक जमा करायचे, असा हा उपक्रम आहे. दर दोन-तीन महिन्यानंतर पुस्तके बदलत जातील, त्यामुळे प्रवास तर चांगला होईल आणि प्रवाश्यांचे वाचनही होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -