घरमहाराष्ट्ररक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून पोलिसांनी केलं रक्तदान

रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून पोलिसांनी केलं रक्तदान

Subscribe

रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून पोलिसांनी स्वत: रक्तदान केला आहे. १५० पोलिसांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला.

ऑक्टोबर महिन्यात त्यासोबतच दिवाळी दरम्यान बऱ्याचदा रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुवटडा भासतो. त्यामुळे रक्ताच्या तुटवड्यावर उपाय म्हणून अंधेरी येथे सोमवारी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात जवळपास १५० हून अधिक पोलिसांनी रक्तदान केले आहे.

१५० पोलिसांनी घेतला पुढाकार

मरोळच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात हे शिबिर पार पडले. २१ ऑक्टोबर हा शहीद दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची माहिती व्ही.एन देसाई रुग्णालयाच्या रक्तपेढीचे संक्रमण अधिकारी डॉ. सुमीर डेम्बला यांनी दिली. लोकमान्य टिळक रूग्णालयाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पोलिसांचाही यामध्ये चांगला प्रतिसाद दिसून आला. १५० पोलिसांनी यामध्ये पुढाकार घेत रक्तदान केलं. या माध्यमातून व्ही.एन.देसाई रुग्णालयाला ८४ रक्ताच्या पिशव्या तर, सायन रूग्णालयाला ६७ पिशव्या देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या महिन्यात रक्ताचा तुटवडा का निर्माण होतो ?

तसंच, आता दिवाळीची सुट्टी जवळ आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजमधील मुलं बाहेर फिरायला जातात. त्यामुळे अशा दिवसांत रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. याचा परिणाम सर्वात जास्त रुग्णांवर होतो. नातेवाईकांना वणवण फिरावं लागतं. रक्ताची शिबीरे ही कमी प्रमाणात भरवली जातात. पण, यंदा रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं.” असंही डॉ सुमीर डेम्बला यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -