Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईत रेमडेसिवीरचा काळाबाजार, गुन्हे शाखेने केली दोघांना अटक

मुंबईत रेमडेसिवीरचा काळाबाजार, गुन्हे शाखेने केली दोघांना अटक

रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजर रोखण्यासाठी नागरिकांनी जास्त किंमतीचे औषधे घेऊ नये

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव जलदगतीने पसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनावर ताण आला आहे. त्यातच कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. तसेच मोठ्या मागणीमुळे राज्यात रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची कमतरता भासत आहे. याचाच काही नफेखोरांनी फायदा घेतला असून रेमडेसिवीरचे इंजेक्शन अव्वा च्या सव्वा रुपयांनी विकत आहेत. तर काहीजण याचा काळाबाजार करत आहे. अशाच एका व्यक्तीला रेमडेसिवीरचा काळाबाजार करताना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने अटक केली आहे. या व्यक्तीकडून पोलिसांनी १२ रेमडेसिवीरच्या औषधाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

अंधेरी ते जोगेश्वरीच्या भागात रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला मिळाली. या माहितीच्या आधारेच मुंबई गुन्हे शाखा क्रमांक १० च्या पथकाने या परिसरात छापेमारी केली. याच छापेमारीत २ व्यक्तींना रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजार करताना अटक केली आहे. यामध्ये अंधेरी परिसरातील एका दुकानातून २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन (लसी) जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

रेमडेसिवीर या इंजेक्शनची किंमत बाजारात १२०० रुपये आहे. परंतु संकटाचा फायदा घेत काही नफेखोर हे इंजेक्शन ५ ते ६ हजार रुपयांनी विकत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीरच्या औषधाची गरज भासते. यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे.

- Advertisement -

राज्याला मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरच्या इंजेक्शनची उपलब्धता व्हावी यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांशी व्हीसीद्वारे संवाद साधला आणि राज्याला येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा काळाबाजर रोखण्यासाठी नागरिकांनी जास्त किंमतीचे औषधे घेऊ नये तसेच जर कोण जास्त किंमतीने औषध विकत असेल तर त्यांच्याबाबत त्वरित कारवाई करावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

- Advertisement -