घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत किंचित घट पण ३५ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत किंचित घट पण ३५ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे दर ८४ टक्के

मुंबईत सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आज मुंबईच्या रुग्णसंख्येच किंचित घट झाल्याचे पहायला मिळाले. मुंबईत ७ हजार २१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत ७ हजार ३८१ रुग्ण नोंदवण्यात आले होती. मुंबईत आतापर्यत नोंद करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ९३ हजार ९०६ इतकी झाली आहे. तर आज मुंबईत ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आज ४५ हजार ३५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

- Advertisement -

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे दर ८४ टक्के इतका आहे. आज मुंबईत ९ हजार ६४१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आजवर ४ लाख ९६ हजार २६३ कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत १३ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंतचा विचार केला असता कोरोना रुग्ण वाढीचा दर हा १.४४ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या १०५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १४१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मंबईसह राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. मुंबईतील ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी मुंबई महापालिका स्वत: ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती आतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ऑक्सिजनच्या आपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील ६ विविध रुग्णालयातून १६८ रुग्णांचा पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: महाराष्ट्राच्या रुग्णसंख्येने इटलीला क्रॉस करून आठव्या स्थानावर झेप!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -