घरCORONA UPDATEमुंबई पोलिसांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा; आतार्यंत १०५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई पोलिसांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा; आतार्यंत १०५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती खूप बिकट झाली आहे. मुंबईत सध्या कोरोनामुक्त होण्याची संख्या ही नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक दिसत आहे. तरी देखील चिंतेची बाब म्हणजे या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मुंबई पोलिसांना बसताना दिसत आहे. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कोरोनाच्या काळात २४ तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. काल मुंबईतल्या २ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतार्यंत मुंबई पोलीस दलात १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबईत काल (शनिवारी) दिवसभरात ५ हजार ८८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ५४९ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईची आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २२ हजार १०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ७१९ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख २९ हजार २३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत सध्या ७८ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात मुंबईत ३९ हजार ५८२ जणांच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५२ लाख ३ हजार ४३६ जणांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Oxygen Shortage: मुंबईला २ दिवस ऑक्सिजन तुटवड्याचा हायअलर्ट!, मनपा आयुक्तांचा प्लॅन B काय?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -