घरमुंबईमध्य रेल्वेवर ११ एप्रिलला मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ११ एप्रिलला मेगाब्लॉक

Subscribe

मुंबई मध्य रेल्वेचा रविवारी ११ एप्रिल २०२१ रोजी मेगाब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुतीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारच्या रेल्वे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे रविवारी मुंबईकरांना प्रवास करताना विविध अडचणी येणार आहेत. हा मेगा ब्लॉक सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरु असणार आहे. त्यानंतर सर्व रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे. हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वे आणि मुंबई विभागावर लागू केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक हा सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत असणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सुटणा-या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात जाणार आहेत. तसेच या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

- Advertisement -

घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणा-या अप- धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत रेल्वे गाड्या मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाही.

कुर्ला ते वाशीदरम्यान मेगा ब्लॉक

कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावरही रविवारी (११ एप्रिल २०२१) सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्ला दरम्यान तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

विक्रोळी ते मुलुंडदरम्यानही रविवारी मेगाब्लॉक

विक्रोळी ते मुलुंडदरम्यानही रविवारी (११ एप्रिल २०२१) ला मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ट्रॅफिक व पॉवर ब्लॉकचे काम करण्यासाठी रविवारी ०१.०० वाजता ते पहाटे ०४.३० वाजे पर्यंत(१० एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्री) अप धीम्या व जलद मार्गावर विक्रोळी ते मुलुंड स्थानकांदरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. परंतु अप विशेष गाड्या ठाणे / मुलुंड येथे नियमित केल्या जातील परंतु नियोजित वेळेपेक्षा या गाड्या २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

या ब्लॉकमुळे, रेल्वे खालीलप्रमाणे चालविण्यात येईल:

खालील अप विशेष गाड्या ठाणे / मुलुंड येथे नियमित केल्या जातील आणि नियोजित वेळेच्या २० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर येतील.

02810 यूपी हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ९.४.२०२१ (जेसीओ)

01134 अप मंगलोर जेएन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. १०.४.२०२१ (जेसीओ)

01020 अप भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष दि. ९.४.२०२१ (जेसीओ)

02541 अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ९.४.२०२१ (जेसीओ)

08519 अप विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ९.४.२०२१ (जेसीओ)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -