घरमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या परीक्षांचा निर्णय थोड्याच दिवसात; वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावी, बारावीच्या परीक्षांचा निर्णय थोड्याच दिवसात; वर्षा गायकवाड यांची माहिती

Subscribe

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरु आहे. येत्या काही दिवसांत परीक्षांबाबत निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्षा गायकवाड यांनी आज काही आमदारांशी चर्चा केली. कोरोनाच्या काळात दहावी-बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या? परईक्षा लांबणीवर टाकायच्या का? आदी प्रश्नांवर वर्षा गायकवाड यांनी आमदारांशी चर्चा केली. दरम्यान, सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

सर्व विद्यार्थी परीक्षांच्या चिंतेत आहेत. आम्ही परीक्षांबाबत विविध नेत्यांशी, शिक्षक, मुख्यध्यापकांशी चर्चा केली. परीक्षांबाबत चर्चा सुरु आहे. आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची देखील काळजी आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन येत्या काही दिवसात दहावी, बारावीच्या परीक्षांचा निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

- Advertisement -

विद्यार्थी, पालकांनी घाबरु नये – आदित्य ठाकरे

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांनी घाबरु नये, असं आवाहन केलं आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे संदेश आम्हाला प्राप्त होत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी काळजी व्यक्त केली आहे. मी विद्यार्थ्यांच्या समस्या मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत पोहोचवल्या आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या भविषअयाबरोबरच त्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. वर्षा गायवाड सधअया सर्व शिक्षण मंडळाशी चर्चा करुन योग्य तो पर्याय काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी घाबरु नये. राज्य सरकार विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांची सुरक्षितता याबद्दल कटिबद्ध आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -