Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE मुंबईत एका आठवड्यात मायक्रो कन्टेनमेन्ट झोनमध्ये ३५ टक्यांनी घट

मुंबईत एका आठवड्यात मायक्रो कन्टेनमेन्ट झोनमध्ये ३५ टक्यांनी घट

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्य़ा आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश मिळत आहेत. यात मुंबईतील मायक्रो कटेंमेंट झोनमध्ये एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासाजनक माहिती समोर येत आहे. दरम्यान पालिकेकडून कोणत्याही निवासी इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्या ती संपूर्ण इमारत मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) म्हणून घोषित केली जाते.

कोरोनासंबंधित पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात सध्या ७२८ सक्रिय मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. यापूर्वी २८ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतीय या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)ची इमारतींची संख्या ११०१ वर पोहचल होती. सध्या अंधेरी पश्चिमकडील के पश्चिम (केडब्ल्यू) पालिका वॉर्डमधील जुहू, विलेपार्ले, वर्सोवा आणि लोखंडवाला या परिसरात तब्बल २१५ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. जी मुंबईतील सर्वाधिक संख्या आहे. त्यापाठोपाठ पालिकेच्या डी वॉर्डमधील ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडमधील १६४ इमारती या ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडवर १६४ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)आहेत. तर कुर्ला आणि चांदिवली या एल वॉर्डमधील ५८ इमारती या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर भायखळा व्यापणार्‍या ई वार्डमध्ये ५६ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) आहेत.

- Advertisement -

दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यानेही मुंबईतील मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)मध्ये घट होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, मार्चनंतर मुंबई कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. बहुतांश घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यामुळे आपोआपच इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत होते. दरम्यान मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदवले जात आहे. यात एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन रुग्ण आढळत असल्याने त्यांना अगलीकरणात ठेवणे सोपे होत असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, नागरिक लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
दरम्यान लोकल सेवा बंद केल्याने नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणचा वावर कमी झाला. ज्यामुळे कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे, गोमारे म्हणाल्या. फेब्रुवारीपर्यंत बोरिवलीच्या आर. सेंट्रल (RC) वॉर्डमध्ये बहुतांश इमारती सीलंबद करण्यात आल्या होत्या त्यामुळे बोरिवलीत सर्वाधिक मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)नोंदवण्यात आले होते. मात्र या वॉर्डमध्ये मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) नाहीत. असेही पालिका अधिकारी म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान पालिकेने प्रत्येक सीलबंद इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करत असल्यास नागरिकांची माहिती पालिकेला कळवा असे सांगितले आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात असल्याने रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होत आहे. अशी माहिती सहाय्यक प्रभाग प्रभारी भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे. मुंबईत दरम्यान मुंबईत सक्रिय अॅक्टिव्ह सीलबंद फ्लोर्सच्या (SF) तुलनेत झोपडपट्टी भागातील कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ)ची संख्या कमी आहे. यापूर्वी मुंबईत इमारतींचे १० हजार ६८६ सील्ड फ्लोर्स (SF) होते तर झोपडपट्टीत ११५ सक्रिय कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ) होते. सध्या शहरात केवळ ९ हजार ६९ सील्ड फ्लोर्स (SF) आहेत तर १०२ कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ)आहेत.


मुंबईत एका आठवड्यात मायक्रो कन्टेनमेन्ट झोनमध्ये ३५ टक्यांनी घट


 

- Advertisement -