घरमुंबईदुर्घटनांसाठी जबाबदार मुंबई महापालिका व सरकारचा पर्दाफाश करणार - प्रवीण दरेकर

दुर्घटनांसाठी जबाबदार मुंबई महापालिका व सरकारचा पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढलेत. ताडदेव आगीच्या दुर्घटनेला पूर्णत: महापालिका जबाबदार असून, अनेक निष्पापांचे नाहक जीव गेलेत. आता असे आणखी किती निष्पाप जीव महापालिकेला हवे आहेत? मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख जाहीर केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही, तर अशा घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज आहे.

मुंबईः ताडदेवमधल्या नाना चौकातील कमला या 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झालेत. त्यातील 3 जण गंभीर आहेत. विशेष म्हणजे आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरूनच विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झालेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही ठाकरे सरकार आणि महापालिकेचा पर्दाफाश करणार असल्याचं थेट आव्हानच देऊन टाकलंय.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढलेत. ताडदेव आगीच्या दुर्घटनेला पूर्णत: महापालिका जबाबदार असून, अनेक निष्पापांचे नाहक जीव गेलेत. आता असे आणखी किती निष्पाप जीव महापालिकेला हवे आहेत? मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख जाहीर केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नाही, तर अशा घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाय करण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून आगामी अधिवेशनात या दुर्घटनांसाठी जबाबदार असलेल्या मुंबई महापालिका व राज्य सरकार यांचा निश्चितच पर्दाफाश करीन, असे थेट आव्हानच प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारला दिलंय.

- Advertisement -

जबाबदार लोकांवर कारवाई करावी- फडणवीस

- Advertisement -

दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील आग दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहानुभुती व्यक्त करतो. पण दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयाने दाखल करून द्यायला नकार दिल्याची माहिती आहे. याच कारणामुळे मृतांचा आकडा वाढल्याचं सांगितलं जात आहे. जर हे खरं असेल तर महापालिका आणि राज्य प्रशासनानं तात्काळ याची दखल घेत कारवाई करावी. संबंधित जे जे कोणी याला जबाबदार आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


 हेही वाचाः  Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -