घरताज्या घडामोडीMumbai rain : पावसाचा फटका, पेडर रोड येथे भूस्खलनासह ५० झाडे उन्मळून...

Mumbai rain : पावसाचा फटका, पेडर रोड येथे भूस्खलनासह ५० झाडे उन्मळून पडली

Subscribe

पेडर रोड येथे भूस्खलनासह ५० झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

मुंबईला सतत दोन दिवस झोडपल्यानंतर आज देखील मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने तळे तयार झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. तर बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, पेडर रोड येथे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच याठिकाणी एक दोन नाही तर ५० झाडे उन्मळून पडली आहेत.

५० झाडे उन्मळून पडली

एकीकडे जमीनीचे भूस्खलन झाले आहे तर दुसरीकडे पेडररोडवर केम्स कॉर्नर येथे भिंत खचून ४० ते ५० झाडे उन्मळून पडली आहे. उड्डाण पुलावरही वृक्ष उन्मळून पडल्याने उड्डण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच रस्ते वाहतूकही बंद झाली आहे. याशिवाय मातीचा ढिगाराही रस्त्यावर आल्याने या परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू केले आहे. वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती मिळताच पालिका आयुक्त आय एस. चहल यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हा रस्ता आणि उड्डाण पूल मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने, मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -