घरताज्या घडामोडीमुंबईत पहिले 'वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट'

मुंबईत पहिले ‘वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’

Subscribe

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पूर्व उपनगरात घाटकोपर येथे भारतातील पहिले आधुनिक सेवासुविधांनी दुसज्जीत असे दुमजली ‘वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’ ( सुविधा) उभारण्यात आले आहे. या ‘टॉयलेट’मध्ये महिला, पुरुषांसाठी ३८ शौचकूपे असून वाॅशिंग मशिन, पिण्याचे पाणी, स्नान, मुतारी, शुद्ध पिण्याचे पाणी, आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील विविध सार्वजनिक सेवासुविधांमध्ये आणखीन एका आधुनिक सुविधेची भर पडली आहे. वर्षभरात २० हजार लोकांना या टॉयलेटचा माफक दरात वापर करता येणार आहे. तसेच, या टॉयलेटमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करून अंदाजे १० दशलक्ष लिटर पाण्याची बचत करण्यात येणार आहे.

घाटकोपर (पश्चिम), जगदुशानगर नजीक शिवस्फुर्ती मंडळ येथे ‘ हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या सौजन्याने, मुंबई महापालिका आणि एचएसबीसी यांच्या सहभागातून स्थानिक नगरसेविका डॉ.अर्चना संजय भालेराव व माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रयत्नाने भारतातील पहिले ‘वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’ उभारण्यात आले आहे. या आधुनिक टॉयलेटचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजेंद्र राऊत आणि माजी नगरसेवक संजय भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

- Advertisement -

मुंबईत सर्वत्र ‘वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’ 

घाटकोपर येथे महापालिका व खासगी सहभागातून पहिले वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’ उभारण्यात यश आल्याने आता संपूर्ण मुंबईत अशा प्रकारचे ‘वॉटर रिसायकलींग कम्युनिटी टॉयलेट’ उभारण्याचा प्रयत्न पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा मानस असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे या टॉयलेटची पाहणी करुन अधिक माहीती घेण्यासाठी मंत्री आदीत्य ठाकरे यांच्या सोबत मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी या टॉयलेटच्या उदघाटनाप्रसंगी उपस्थिती दर्शवणार असल्याचे समजते.


हेही वाचा – कोरोनाचा बंदोबस्त, गल्लीबोळ, शौचालयात महापालिकेची सॕनिटायजेशन मोहीम

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -