घरमुंबईपालिकेचे आरोग्य संचालक पद अद्याप रिक्त !

पालिकेचे आरोग्य संचालक पद अद्याप रिक्त !

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेचे आरोग्य संचालक पद अद्याप रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक निर्णय घेण्यास गैरसोय होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक हे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील आरोग्य अत्यावश्यक स्थितीत घ्यायचे निर्णय, औषध पुरवठा, डॉक्टरांच्या नेमणूका आणि आरोग्य सेवेतील महत्व पूर्ण निर्णय घेणारे हे पद आहे. त्यामुळे रुग्णालयीन आणि निर्णायक मुद्यांच्या मान्यतेसाठी प्रमुख रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे धाव घ्यावी लागत आहे. पण, यामुळे बराच वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार पुढे येत आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून पद रिक्त

या पूर्वी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक पदावर डॉ. अविनाश सुपे हे होते. डॉ. सुपे ३१ ऑक्टोबर या दिवशी निवृत्त झाले. पण, १ नोव्हेंबर २०१८ पासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना संचालकांच्या सहीची आवश्यकता भासल्यास महापालिकेच्या चारही प्रमुख रुग्णालयातील अधिष्ठातांच्या सह्या घेण्याकरीता धाव घ्यावी लागते. यात वेळ खर्च होऊन कामे खोळंबून राहतात. याचा त्रास कर्मचारी आणि नागरिकांना होत आहे.

- Advertisement -

दुहेरी पद पाहत होते

१९९९ पासून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये संचालक हे पद अस्तित्वात आले होते. या पदावर राहणाऱ्या अधिकाऱ्याला महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. धोरणात्मक, निर्णयात्मक, आरोग्य सल्ला आणि आखणीबद्ध निर्णयावर लक्ष द्यावे लागते. डॉ. अविनाश सुपे हे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता पद आणि संचालक पद असे दुहेरी काम पाहत होते.

“महानगरपालिका प्रमुखाला शहरातील एखाद्या आरोग्य समस्येवर उत्तर हवे असल्यास संचालकच देत असतात. आपत्कालीन स्थितीत डॉक्टरांच्या नेमणूकांवर, रुग्णांच्या औषध पुरवठ्यावर सर्वच निर्णय घेणारे महत्वाचे पदच दोन महिन्यांपासून रिक्त आहे. या रिक्त पदी लवकरात लवकर नेमणूक करण्यात यावी.”- काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -